TUDI २३५ महापुरुष. दि. करून संसारवासीजनांच्या मनांत शुद्ध बुद्धि आणि सदिच्छा प्रेरण करितात. परंतु संसारांतील मोहांधकारांत पडून तुम्ही त्यांना विसरून गेल्यास तुमच्यावर आपल्या मंगल कामनांचा प्रभाव घडवून आणण्यास ते समर्थ होत नाहींत. “ स्मृति, श्रद्धा, भक्ति आणि प्रेम यांचें बंधन केव्हांहि छित्र होत नसते. स्मृति, श्रद्धा, भक्ति आणि प्रीति हीं इहलोक आणि परलोक त्यांच्यामध्ये निगूढ बंधन स्थापित करून भिन्न भिन्न आत्म्यांमध्ये योगोत्पादन करित असतात. स्मृति, श्रद्धा, भक्ति आणि प्रेम यांच्या गाढतेनुसारच भिन्न भिन्न आत्म्यांच्या ठायीं निकटता •संस्थापित होत असते. 16 उलट पक्षों, विस्मृति ही एका आत्म्यापासून दुसन्या आत्म्याला पूर्णपणे भिन्न राखित असते. अर्थात्, तुझी जर परलोकगत पिता, माता किंवा दुसऱ्या शुद्धाम्यांस विसरलां, तर तुझांला सन्मार्गगामी करणे त्यांनां कसें बरें शक्य होईल? तुमच्या हृदयाला त्यांच्या सामर्थ्याचा मुळींच स्पर्श होणार नाहीं ! “ संसारांतील कुमै, कुसंसर्ग, पापांचार यांची वासना हृदयांतून दूर करण्या- साठी शुद्धाकांचे आणि साधुपुरुषांचें सदासर्वदा चिंतन करित असावें. साधूंचे सङ्घयंत सदा डोळ्यांपुढे ठेवावे. तसे केल्यास परलोकगत शुद्धात्मे आणि संसार- चासी साधुपुरुष तुझांला सत्यानुवगर्ते करण्यास समर्थ होतील. मन पवित्र झालें नाहीं, किंवा ससारांतील चिंता, काळज्या, व्यवधान यांपासून क्षणभरहि एकांत मिळविण्यास मनुष्य समर्थ झाला नाहीं, तर त्याच्या अंतःकरणांत सदिच्छा आणि शुभवृत्तींचा कधीहि उदय व्हावयाचा नाहीं. 6: संसारांतील मोहांधकारांत धनसंपत्तीच्या प्रलोभनांनी मुग्ध झालेला असा तूं आम्हांला जो अगदीच विसरून गेला आहेस तसा विसरला नसतास तर ख त्रीनें सांगतों, आह्मांला तुझ्या मनांत सदिच्छा उत्पन्न करतां येती व आज ज्या अनेकविध विनात आणि दुर्घटना तुला अनुभवाव्या लागल्या त्यांतून तुझी मुक्तता झाली असती; परंतु गेल्या पस्तीस वर्षांत कधी एक पळभरसुद्धा आह्मांला तुझ्या अंतः करणांत प्रवेश करतां आला नाहीं. आमच्याविषयींच्या गाढ विस्मृतीनें तुझ्या हृदयाचे द्वार आम्हांला अजिबाद बंद केलें होतें. “ बेटा काशीनाथ! तूं आणि नारायणकुमारीने माझ्या निर्वाणलाभांत विशेष व्यत्यय केला आहे ! वेवळ तुमच्यासाठींच मला या जड जगतांत कार्य करावें लागले. वास्तविक ह्मटलें असतां जड जगत् हें माझें कार्यक्षेत्र नव्हे. तुम्ही या
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३४
Appearance