Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! मानकुमारीच्या मृत्युनंतर दोनचार दिवसांतच गंगाप्रसादाच्या मनाची चमत्कारिक स्थिति होऊन गेली. आहार, निद्रा यांचा त्याग करून तो सीतारामाच्या मंदिरांत धरणे धरून बसला. आतां त्याला दुसरे तिसरें कांहींच सुचेना ! माझ्या या घोर पातकांला प्रायश्चित्त तरी का आहे ?" हाच त्याचा रात्रंदिवस जप चालला होता. काशीनाथाने आणि नारायणकुमारीनें त्याचें शांतवन करण्याची शर्थ करून पाहिली, नानाप्रकारें त्याची विनवणी केली, परंतु तो कोणाचेंच ऐकेना ! " मला पित्यापाशी घेऊन चल पित्याच्या चरणांवर मस्तक ठेवून मी त्यांची क्षमा मागणार!" असें तो दीनस्वरानें काशीनाथाला सांगू लागला.

आज गंगाप्रसाद सीतारामाचे मंदिरांत रामचंद्राच्या मूर्तिसमोर पडला होता. काशीनाथ, नारायणकुमारी, चांदकुमारी आणि कैलासेश्वरी त्याच्याजवळ बसली होतीं. सूर्य अस्तास जाण्याचा समय झाला होता. अशा वेळी बुन्दिया हातामध्ये एक पत्र घेऊन तेथें आली. पत्र काशीनाथाकडे देऊन ती म्हणाली " तुम्हाला देण्यासाठी एका सन्याशानें हें पत्र दिले आहे " २३४ काशीनाथानें तें पत्र घेऊन विचारले “ तो सन्यासी कुठे आहे ? ” बुन्दिया ह्मणाली " माझ्या हातीं पत्र देऊन तो निघून गेला!” काशीनाथानें तें पत्र उघडले व तो मोठ्यानें वाचूं लागला. पत्रांत पुढील प्रमाणे लिहिलें होतें:- - " बेटा गंगाप्रसाद ! मानकुमारीसाठीं असा शोकाकुल होऊं नकोस ! इद्द लोकाचा त्याग करून मानकुमारी दिव्यलोकांत गेली आहे. मुसलमानांच्या राज्याच्या विनाशाचें बीज पेरून मानकुमारी स्वर्लोकी गेली आहे. पंचवीस वर्षांच्या आंतच मुसलमानी सत्तेचा विलोप होईल; परंतु ही मुसलमानी सता नष्ट होण्याच्या संधीस अगर तदनंतर अयोध्येमध्ये घोर विद्रोहानल भडकेल. हजारों हजार स्त्रीपुरुष त्या विद्रोहानलांत जळून भस्म होतील, यासाठीं तूं मुलांबाळांसह काशीत जाऊन रहा. म्हणजे वृद्धापकाळ निर्विघ्नपणें तुला ईश्वराचे चिंतन करता येईल. " आणखी एक तुला सांगावयाचें आहे. आपल्या परलोकवासी पूर्वजांनां तूं केव्हां विसरूं नकोस. परलोकीं गेलेले शुद्धात्मे, त्याचप्रमाणें हिमाचलवासी सिद्धपुरुष, सदासर्वकाल या सुखदुःखपूर्ण संसाराचें मंगल चिंतित असतात. जड जगतामध्ये कार्य करणे त्यांचें साध्य नसल्यामुळे ते आध्यात्मिक जगतांत कार्य