महापुरुष २३३ चांदकुमारी यांनां निवेदन केलें. तो म्हणाला “ पंडित देवीप्रसाद सांप्रत पुण्यशील महात्म्यांच्या आशीर्वादानें साधृपदास पहोंचून हिमालयांत ईशचिंतन करित राहिले आहेत. ते केव्हांहि मिथ्या भाषण करावयाचे नाहींत. आमचे आजोबा जगन्नाथ शास्त्री अद्यापि जीवंत असल्याचें त्यांनी मला सांगितले, आजोबा हल्ह्रीं देवत्वास पोहोंचले आहेत. आतांपर्यंत आमच्यावर गुदरलेल्या सर्व घोर प्रसंगांतून त्यांनीच आमची मुक्तता केली !” काशीनाथाची ही हकीगत ऐकतांच राणी नारायणकुमारी हणाली " मलाहि दोन वेळ आत्महत्येच्या पातकापासून एका देवतेन परावृत्त केलं, खरोखर, ती देवता दुसरी कुणीहि नसून आमचे आजोबाच होत! आतां माझी खात्री झाली. " He मुलाचें आणि कन्येचें हें भाषण श्रवण करतांच वृद्ध गंगाप्रसादाचें अंतःकरण भडभडून येऊन अत्यंत पश्चात्ताप पावून तो स्वतःशींच म्हणू लागला बाळा काशीनाथा ! बेटा मानकुमारी ! खरोखर तुम्ही धन्य आहां ! बाळपणापासूनच तुमची तुमच्या आजोबांवर अत्यंत श्रद्धा असे; भक्तिपूर्वक तुम्ही त्यांची सेवा करित होतां; त्यांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही वागत होतां म्हणूनच तुमच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी तुम्हांला दर्शन दिले व पापापासून तुमचा उद्धार केला; परंतु मी केवढा पापी, पाषंड, नराधम ! मला कुलांगाराला पितृदेवांच्या दर्शनाचा लाभ कसा व्हावा! पितृदेवांनीं संसाराचा त्याग केल्या दिवसापासून मला चांडाळाला कधीं एक दिवसहि त्यांचें स्मरण झाले नाहीं! ते कुठे गेले असतील, काय करित ..असतील, त्यांची अवस्था काय असेल, ही शंका कधी कधीहि माझ्या मनांत आली नाहीं ! कोणच्या उपायांनीं धनदौलत, जमीनदारी, जहागिरी मिळवितां येईल, बादशहाची मर्जी कशा रीतीने सुप्रसन्न करून घेतां येईल, लोकांत आपली मान- प्रतिष्ठा कशी वाढेल, याच गोष्टींचा मला रात्रंदिवस ध्यास लागलेला! जन्मापासून मीं दुष्टानें किती किती तरी गोष्टीत पितृदेवांच्या आज्ञांचें उल्लंघन केलें! माझ्या या घोर पातकांला प्रायश्चित तरी का आहे ? ' आपल्या या पातकांला प्रायश्चित्त तरी आहे? ' हा हृद्रोग रात्रंदिवस गंगाप्रसा- दाच्या अंतःकरणाला जाळूं लागला. पित्याचे स्मरण करत तो जो जो आपल्या • आयुष्याचे पर्यालोचन करूं लागला तो तो आपण किती तरी घोर अपराधी आहों असे वाटून त्याला अधिकाधिक पश्चात्ताप होऊं लागला. पित्राज्ञेचें उल्लंघन केल्या- मुळेच आपली ही दशा झाली, पित्याचा अपमान केल्याच्या पातकामुळेच आपल्यावर देवांचा कोप होऊन त्यांनीं ह्रीं संकटें आणली, असे त्याला वाटू लागलें.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३२
Appearance