Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ ही रामाची अयोध्या ! गलितधैर्य होऊन त्याला मूर्च्छाहि येई; परंतु मानकुमारीच्या देहांतून प्राणज्योति निघून जातांच त्याचें अंतकरण दगडासारखें कठोर झालें ! त्या क्षणानंतर त्याच्या नेत्रांत अश्रुबिंदुहि दिसला नाहीं ! विलक्षण धैर्यावलंब करून विधीपूर्वक त्यानें पत्नीच्या मृतदेहाची अंत्येष्टी क्रिया केली, चंदनाच्या चितेवर मानकुमारीचा मृत देह ठेविला. क्षणार्धीत प्रज्वलित झालेल्या अग्नीच्या ज्वालांनी मानकुमारीला आपल्या पोटांत घेतलें ! तिच्या बाह्य शरीराचें जळून भस्म झालें ! ! सर्व क्रिया यथासांग झाल्यावर त्या स्मशानांत मानकुमारीच्या चितेशेजारीं उभा राहून सूर्य नारायणाकडे दृष्टि लावून अयोध्यानाथ गंभीरवाणीने ह्मणाला " हे सर्वसाक्षी दिवाकर! हे भूतधात्री धरिणि ! हे ज्योतिर्मय पापनाशक अग्ने! हे स्वर्गवासी देवांनो! हे वैकुंठवासी पितरांनों ! हे पवित्र आत्म्यांनों ! हे सर्व पंचमहाभुतांनों ! तुम्हांला साक्षी ठेवूनच ह्या माझ्या सहधर्मिणीचें मीं पाणिग्रहण केलें होतें. पूर्वजन्मींच्या अघोर पातकांमुळे ह्या देवीच्या सेवेस मी अंतरली आहे. माझ्या हृदय देवतेने निराहारानें प्राणत्याग केला आहे. गेली तीन वर्ष तिनें संतोषानें केव्हांहि अन्नग्रहण केलें नाहीं. अर्थात, हा निराहारच तिच्या मृत्यूचें मुख्य कारण आहे. तुमच्या साक्षीनें पाणिग्रहण केलेल्या ह्या माझ्या परम साध्वी पत्नीला आज पुन्हा मी तुमच्या हवालीं करित आहें, आणि तुमच्याच साक्षीने मी आज प्रतिज्ञा करितों कीं, माझ्या पुण्यशील पत्नीनें निरहाराचें जें व्रत चालविलें तेंच मीहि पुढें चालवून ईश्वरचिंतनांत माझें शेष आयुष्य घालवीन. या क्षणापासून अन्नाला किंवा जलाला स्पर्शहि करणार नाहीं ! " स्मशानांतून घरी येतांच राणी नारायणकुमारी आणि चांदकुमारी यांच्या हातांत कैलासेश्वरीचा हात देऊन वृद्ध गंगाप्रसादाच्या चरणांवर मस्तक ठेवून अयोध्यानाथ म्हणाला " बाबा ! आपल्याला तीन कन्या होत्या. त्या तीनहि कन्या आज आपल्या घरी आहेत! मला निरोप द्या ! " अयोध्यानाथहि आपल्याला सोडून चालला, हे पाहून कैलासेश्वरीने फारच आक्रोश मांडिला; परंतु अयोध्यानाथानें तिला नानाप्रकारे समजावून त्याच रात्रीं सर्वोचा जन्माचा निरोप घेऊन तो सीतापुरहून निघाला व गाझीपुराजवळील एका निबिड अरण्यांत प्रवेश करून तेथें निराहारानें ईश्वरचिंतन करित राहिला. मानकुमारीच्या मृत्युनंतर काशीनाथानें आपल्या पर्यटनासंबंधाचें सविस्तर वर्तमान आपला पिता गंगाप्रसाद आणि दोघी भगिनी राणी नारायणकुमारी व