योग्याचा आश्रम. अतिशयोक्ति आहे, अगर आपली मति या बाबतींत फुंठित होते, असे पाहिजे तर तो झणो; परंतु ती साफ कल्पना आहे, असे ह्मणण्याचें धाडस त्याच्यानें करवणार नाही, हे नि:संशय आहे. अत्यंत शीतल अशा हिमतुषारांनीं सदा सर्वकाळ आवृत असलेल्या नगाधिराज हिमालयावर ऋषीमुनींचे अनेक आश्रम आहेत, व आपल्या त्या पवित्र, शांत, एकांत आश्रमांत भगवचिंतनांत निमग्न होऊन राहिलेले योगीमुनी वास करित आहेत, हे वाचकांनां ठाऊकच असेल. या योग्यांपैकी कित्येक महात्मे योग- • बलानें आपल्या जडदेहाचा त्याग करून सूक्ष्मदेह धारण करून इच्छामानें करून जगतीतलावार सर्वत्र भ्रमण करित असतात, हेहि पुष्कळांनी ऐकिलें असेल. जगतामध्यें शांति नांदावी, दुःखाचा नाश व्हावा, धर्माची उन्नति व्हावी, लोक • सदाचारसंपन्न व्हावे, हाच कायतो यांच्या तपश्चरणाचा उद्देश असतो, व यांच्या जीविताचे कर्तव्यहि हेच असतें. असें जरी आहे, तरीहि बाह्यजगतामध्ये कोणतीहि गोष्ट करण्यास ते उत्सुक नसतात. क्षुधिताला अन्नदान करणें, तृषार्ताची तृषा शमविणें, दरिद्याला धनवान् करणे, अशा ऐहिक गोष्टींकडे सहसा ते लक्ष्य पुरवित नाहींत. तर अंतर्जगतांतील दुःखांचा नाश करण्याविषयींच त्यांचा सारा प्रयत्न असतो. ज्यांच्यापासून आधिदैविक, आधिभौतिक सुखदु:खांची उत्पत्ति आहे, अशा अध्यात्मिक आधीव्याधींचा जगांतून समूळ नाश करण्याकडेच यांचे सदासर्वदा लक्ष्य असते. वासना आणि कामना टाकूनच हे परहिताविषयीं झटत असतात. अर्थात्, कोणत्याहि एका देशाचा, जातीचा, अगर शास्त्राचा, यांनां अभिमान नसून जगांतील सर्व देश, सर्व जाती, सर्व धर्मशास्त्रे यांनां सारखींच आदरणीय असतात. अशा प्रकारच्या एका महात्म्याच्या दर्शनास आज आमच्या वाचकांस नेण्याचा आमचा मानस आहे. वाचक हो ! ते पहा, त्या समोरच्या रमणीय आश्रमांत दोघे सत्पुरुष कांहीं बोलत बसले आहेत. त्यांच्या एकंदर व्यवहारावरून त्यांतील एकजण गुरु व दुसरा शिष्य असावा, हें आपण ताडलेंच असेल. हिमालयांतील ह्या कडक थंडीच्या निवारणा- साठी शिष्यानें आपलें सर्वांग एका जाड कामळीनें गुरफटून घेतलेले आहे त्यावरून व त्याची एकंदर चालचर्या पाहून त्याला अद्यापि दिव्यशरीर प्राप्त झाल्याचे दिसत नाही. तथापि त्या भस्मचर्चित गुरूकडे पाहतांच व त्याची ती तेजोमय मूर्ति अवलोकन करतांच त्याला शीतोष्णाची बाधा यत्किचितहि होत नसावी, असें
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३
Appearance