Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! प्रकरण २३ वें. महापुरुष. Ask no more of me my son ! What I can give is given unto you. - Voice from Himalaya. जवळ जवळ तीन वर्षांनीं आज मानकुमारी मरणोन्मुख स्थितींत परत घरीं आली होती. तिचा वृद्ध पिता आणि दोघी बहिणी यांनां आज ती अशा शोचनीय अवस्थेताह का होईना, पण आपल्याला पुनः भेटली, याबद्दल अतुलनीय आनंद झाला होता. त्यांचे मानसिक कष्ट मानकुमारीच्या पुनदर्शनानें पुष्कळच कमी झाले. मृताचा शोक मनुष्य अगदीच विसरूं शकला नाहीं, तथापि कालांतराने त्याची तीव्रता बरीच कमी होते; परंतु जिवंत माणसाच्या विरहाचा शोक मनुष्याला कांहीं केल्या सहन करवत नाहीं! उलट, जसजसा काल वाढत जातो, तसतशी त्या शोकाची तीव्रता अधिकाधिक वाढत जाऊन त्या माणसाच्या विरहवेदनांनीं मनाची फारच शोकाकुल अवस्था होत असते, याचा अनुभव पुष्कळांला असेलच. आपलें हरवलेलें धन आज पुनः सांपडलें, ह्याबद्दल वृद्ध गंगाप्रसाद आणि राणी नारायणकुमारी व चांदकुमारी यांनां अतिशय आनंद झाला. २२८ सीतापुर येथे आल्यावर तर मानकुमारीची प्रकृति अतिशयच विकोपास गेली. कानपुराहून लखनौला जाण्यापूर्वी मुळापासून ती आजारीच होती. या तीन वर्षांत तिनें स्वेच्छेनें केव्हांहि अन्नग्रहण केले नव्हते. तशा क्षीण आणि अशक्त स्थितीतच म्हातारीनें बलात्कारानें तिला लखनौला नेऊन बगीच्यांत ठेविलें. तेथें असतांना बादशहा कैलासेश्वरीला आणि आपल्याला सतीत्वापासून केव्हां भ्रष्ट करील नजाणो, अशा दुर्धर घोर चिंतेने तिला ग्रासले होतें. पुढे दर्शनसिंहाच्या बंदिवासा- नंतर त्या जनशून्य भयाण बगीच्यांत तीनचार दिवस तर शारीरिक आणि मानसिक भयंकर कत्र तिला अनुभवावे लागले व तशा त्या हल्लक प्रकृतीतच रात्रबेरात्र प्रवास करून लखनौहून ती सीतापुरास आली. हे सारे श्रम आतां एकदम उभे राहून घरीं पाय ठेवांच तिची फारच दुर्धर अवस्था झाली.

  • बेटा ! देण्याजोगें होते ते सर्व मी तुला

माझ्यापाशीं कांहीं मागूं नको ! देऊन चुकलोंच आहे. आणखी -व्हॉइस फ्राम हिमालय,