या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
विनाशाचें बीज. २२७ मानकुमारीला पहातांच काशनाथाच्या मनाची झालेली स्थिति, काशीनाथाच्या प्रथमदर्शनानें कैलासेश्वरीच्या मनांत उदित झालेला अननुभूत भाव, सर्व मंडळीच्या भेटी झाल्यामुळे त्यांनां वाटलेला अपूर्व आनंद इत्यादिकांचे वर्णन करण्यास सध्या आझाला अवकाश नाही. या ठिकाणी आतां एक क्षणभरहि रहाणें उचित नव्हे, असा त्या सर्वांचा निश्चय होऊन तत्क्षणीं सर्वांनीं तेथून प्रयाण करण्याचे ठरविलें व त्या तयारीस तीं लागली. ताबडतोत्र त्यांनी ती जागा सोडली व रात्रभर दुसऱ्या एका निर्भय जागी वस्ती करून दुसऱ्या दिवशी मोठ्या पहांटेस दोन भाड्याच्या गाड्या करून ती मंडळी सीतापुरच्या मार्गास लागली. रस्त्यांत त्यांनी कोठेंहि मुक्काम केला नाहीं. रात्रबेरात्र प्रवास करून तीनचार दिवसांनी सारी मंडळी एकदाची सीतापुरच्या किल्लयांत सुरक्षितपणे जाऊन पोहोचली.