Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विनाशाचें बीज. २२५ मानकुमारीचे मस्तक अद्यापि अयोध्यानाथाच्या मांडीवरच होतें. अकल्पित रीतीनें भेटलेल्या आपल्या प्रिय पति अयोध्यानाथाच्या मुखाकडे ती अनिमिष लोचनांनीं पहात राहिली होती. अयोध्यानाथहि दुःखपूर्ण साश्रु नयनांना पत्नीच्या मुखाकडे टक लावून बसला होता. त्याच्या नवनांतून सारख्या वहाणाच्या उष्ण अश्रुधारा मानकुमारीच्या मस्तकावर पडत होत्या. आपल्या अशक्त कृश हस्तानें तें अश्रुजल ती पुशित होती. त्या सर्व मंडळीच्या अंत:करणाची यावेळची स्थिति, खरोखर, शब्दांनी व्यक्त करतां येणें अशक्य आहे! तीहि आपापल्या हृदयांतील भाव परस्परांशी शब्दांनी प्रकट करण्यास असमर्थ झाल्यामुळे केवळ परस्परांच्या मुखाकडे सारखी टक लावून शोकाकुल होऊन बसली होती. उच्चळणान्या मनोवृत्ति मनुष्याच्या जिव्हेला उत्तेजित करित असतात. तशा अवस्थेत मनुष्य आपल्या हृदयांतील भाव हृदयंगम भाषेनें प्रकट करूं शकतो. परंतु गभीर आणि प्रगाढ हृदयावेग मनुष्याचा वाग्रोध ‘करित असतो. हृदयाची ती अवस्था शब्दद्वारा प्रकट करणे कोणालाहि साध्य नसतें, हा जगाचा अनुभवच आहे. आतां पूर्ण शुद्धीत येऊन मानकुमारीने आपला कृश हस्त मोठ्या कष्टाने उचलून हळुहळू अयोध्यानाथाच्या स्कंधावर नेऊन ठेविला व क्षीण स्वराने ती ह्मणाली "नूना - " कैलासेश्वरी जवळच होती. मानकुमारीची ही हांक ऐकतांच तिनें तिच्या तोंडाशीं आपले तोंड नेऊन रुदन करित आशापुरित दृष्टीने विचारले “काय ह्मणत्येस वहिनी?” गडे, मला जरा तुझा हात दे पाहूं ! ८८ " कैलासेश्वरीनें त्याप्रमाणें करतांच तिचा हात अयोध्यानाथाच्या हातांत देऊन मानकुमारी अश्रुवर्षाव करित ह्मणाली “ प्राणेश्वर ! ज्याच्यासाठी आपण चिरदुःखी होतां, ज्याच्यासाठी आपल्याला भूकतहानहि सुचत नव्हती, ज्याच्या शोधासाठीं त्रिखंड धुंडाळित होतां ते आपलं हरवलेलं धन ध्या! आतां मी आनंदानं मरेन ! " अयोध्यानाथाच्या मुखांतून अक्षरहि फुटेना! एखाद्या दगडी मूर्तीप्रमाणे अनिमिष लोचनांनी तो मानकुमारीच्या मुखाकडे पहात तटस्थवृत्तीनें बसला होता. त्याच्या नेत्रांतून सारखा अश्रुपूर चालला होता. याप्रमाणे सुमारे अर्धा तास गेला. मानकुमारीनें आतां आपला दुर्बल हस्त अयोध्यानाथाच्या स्कंधावरून उचलून त्याच्या हनुवटीवर ठेवून ती ह्मणाली "जीवितेश्वर! आपल मुखकमल अगदी सुकून गेलं आहे. "