Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ ही रामाची अयोध्या ! करविली अन् एनाति बेगमेचे नाककान कापून तिला जशी सोडून दिली होती तसे माझेहि नाककान कापून मग मला सोडण्यासाठी म्हणून मला कैदेत टाकिलं. पुढं मी युक्तीनं कैदेतून पळून आल्यें. " बुन्दिया आश्चर्याने ही सारी हकीगत ऐकत होती. तिने विचारले "पण ही एन्नति बेगम कोण ? " गंगा ह्मणाली " एनाति बेगम ही बादशहाची एक मुताही स्त्री होती. द्दी कुदसिया बेगमेच्या महालांत रहात असे. कुदसिया बेगमेनं बादशहाशी भांडून रागानं विष पिऊन आत्महत्या केली. यांत एनाति बेगमेचा कांहींएक अपराध नव्हता; परंतु कांहींएक विचारपुस न करितां बादशहानं तिचे नाककान कापविले.”* गंगेची ही हकीगत संपल्यावर बुंदिया तिला घरी येण्याविषयीं पुनः वारंवार आग्रह करूं लागली; परंतु गंगा कांहीं केल्या बुंदियेचें ह्मणणें कबूल करीना. साधुसिंह आणि बादशहा यांच्या नरडीचा घोंट घेऊन त्यांच्याविषयींचा आपला सूड उगविल्याशिवाय लखनौंतून आपण पाऊलहि उचलणार नाही, असा तिच्या मनाचा झालेला ठाम निश्चय गंगेच्या त्या वेळच्या त्या एकंदर बोलण्याचालण्यावरून आणि अंगविक्षेपांवरून बुंदियेला स्पष्ट कळून आला. तेव्हां नंतर तिचे मन वळविण्याच्या भानगडींत न पडतां तिने तिला विचारले " बरं, माझ्या सीतेची तुला कांहीं खबर कळली आहे का? ती थेरडी तिला घेऊन इकडे आली होती व तिला ह्मणे कुठल्याशा बगीच्यांत ठेविली आहे. " गंगा ह्मणाली " बादशहाबागेजवळच एका बगच्यिांत काश्मीरहून आणलेल्या मान्ना नांवाच्या एका कंचनीबरोबर तिला ठेवलं आहे ह्मणतात. मला कांहीं नक्की माहीत नाहीं. बरं, आतां तूं जा, मी तुला पुढं भेटेन.” असे ह्मणून गंगा ऊर्फ अफझल उल्निसा महालाकडे निघून गेली.

  • Inayetee Begum and others, who had connived at, or

were privy to, Her Majesty's (Koodsha Begum ) taking poison, are paraded through the bazar every day, with their heads uncovered, with collars on their necks, and irons on their legs and are tortured anā beaten to such a degree, that they must shortly sink under their sufferings. One lack of rupees in cash, besides property, found in their houses, has been confiscated and lodged in the royal trea- sury. -Asiatic Journal, April 1835, Page 237. 4