Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! प्रकरण २ रें. योग्याचा आश्रम.

  • There are more things in heaven and earth, Horatio,

than are dreamt in your philosophy. -- Hamlet. २६ पाश्चात्य ज्ञानसूर्याच्या तेज:किरणांनी हिंदुस्थानांतील लोकांच्या डोळ्यांवरील भ्रमपटल बरेंच दूर झाले आहे लोकांतील अज्ञान, भ्रामक समजुती, अंध श्रद्धा दिवसेंदिवस कमीकमी होत असून युक्तीला न पटणारी, तर्काशीं न टिकणारी आणि प्रत्यक्ष प्रमाणांनीं सिद्ध न होणारी गोष्ट लोक सहसा ग्रहण करीनातसे झाले आहेत. पूर्वीचे ते श्रद्धावान् गुरू, तो श्रद्धायुक्त शिष्यवृंद व श्रद्धा असलेलीं ती शास्त्रे सर्व अंतर्धान पावून त्यांच्या जागीं, युक्ति, प्रमाण, तर्क यांचा पूर्ण पगडा बसला आहे, आणि त्यामुळेच सांप्रत आपल्या देशांत नानाविध धर्म, नानाविध आचार, नानाविध मत प्रचारांत येऊन लोक आपापल्या मताप्रमाणें वर्तन करित आहेत. अशा या पूर्ण मतस्वातंत्र्याच्या कालांत युक्ति, प्रमाण, तर्क इत्यादिकांस घटकाभर गुंडाळून ठेवून केवळ श्रद्धेनेच एखाद्या गोष्टीचे अवलोकन करूं सांगणारा- वर पुष्कळांचा विश्वास बसणार नाहीं हें साहजिक आहे; परंतु या मंडळीने थोडासा सूक्ष्म विचार केल्यास आपले अज्ञान त्यांच्या तत्क्षणी ध्यानांत येईल. या - विशाल विश्वामध्ये प्रत्यहीं अतर्क्स, अलौकिक असे असंख्य प्रकार आपल्या दृष्टीस पडत असतात, त्यांच्यापुढे मानवीज्ञान, गर्व, ताठा सारे विरून जाऊन आपण अगदी मतिमंद नतो. आपला तर्क चालत नाहीं, युक्ति लंगडी पडते, बुद्धि कुंठित होते! फार लांब कशाला, आपल्या जन्ममृत्यूचीच गोष्ट घेऊं, आपण कोठून येतों व इहलोकचा वास पुरा झाल्यावर कोठें जातो, याची यथार्थ कल्पना कोणाला आहे काय ? अंधकारावस्थेतूनच आपण जन्मास येतो व अंधकारावस्थेतच पुनः विलीन होतों. सारांश, चिरांध अशा अवस्थेतच आपण या सुटींत विचरण करित असतो. ही प्रत्येकाच्या नित्य अनुभवांतील गोष्ट असल्यामुळे युक्ति, प्रमाण, तर्क यांच्या कसोटीस न उतरणारी एखादी गोष्ट एकदम खोटी आहे असे ह्मणण्याचें साहस विचारी वाचक सहसा करणार नाहीं. ती अतर्क्य आहे, अथवा तींत बरीच

  • होरेशियो ! तुझ्या तत्त्वज्ञानांत ज्याची कल्पनाहि नाही, अशा किती तरी

गोष्टी ह्या मर्त्यभूमीत आणि स्वर्गात आढळून येतात. -हंमलट.