Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ ही रामाची अयोध्या ! प्रकरण २२ वें. विनाशाचें बीज. waf

  • The integrity of the upright shall guide them but the

perverseness of the transgressors shall destroy them. — Proverbs : Chap X1 - 9. कुकर्म, पापाचरण, सदसद्विवेकबुद्धीचा खून आणि कर्तव्याचे उल्लंघन हो हळुहळू मनुष्याच्या अधःपाताचें बीज पेरित असतात. आपल्या घोर दुष्कर्माचें, अघोर पातकांचें अवश्यभावी फळ चुकविणें कोणालाहि साध्य नाहीं. दर्शनसिंहाला कारागृहांत पाठ- विल्याच्या दुसऱ्याच दिवश नासीरने आपली आई जनावे आलि हिला राजवाड्यांतून हांकून लाविली. बादशहाच्या ह्या भयंकर अत्याचारामुळे जनाबे आलीने आपल्या दासदासी आणि अंतःपुरांतील स्त्रीसैनिक यांसह राजवाडा सोडून लखनौपासून तीन कोसांवरील मूसाबाग येथे जाऊन वास्तव्य केलें. दर्शनसिंहाची कारागृहांत योजना आणि लगेच जनावे आलीचा बादशहाने चालविलेला भयंकर छल, ह्या दोन्ही गोष्टींचा कांहीं तरी निकट संबंध असावा, असा लोकांचा साहजिकच समज झाला. व जो तो आपल्यापरी नाना प्रकारचे तर्कवितर्क करूं लागला. इकडे नासीरनेंसुद्धां स्वतः रेसिडेंटला कळविलें कीं, दर्शनसिंह हा आपल्याला पदच्युत करण्याच्या कारस्थानांत गुंतला असून जनावे आलि बेगमेचें त्या कृत्यांत पूर्ण अंग आहे ! परंतु वास्तविक प्रकार याच्या अगदी उलट होता. दर्शनसिंहाचें आणि जनाचे आलि वेगमेच पुष्कळ दिवसांपासून हाडवैर होतें. जनाबे आलि बेगमेचा मानभंग करून दरबारांतील तिचें वजन आणि मानमरातब कमी करण्याविषयों दर्शन सिंहाने बादशहाचा सारखा पिच्छा पुरविला होता. अर्थात्, हीं उभयतां एकत्र मिळून कोणतेह गूढ कारस्थान रचतील, असा यत्किंचित् संभव नव्हता. सारांश, या एकंदर भानगडीं- तील रहस्य काय आहे, हे कोणालाच बरोबर कळले नव्हते. आणि समजण्यास मार्ग तरी काय होता ? बादशहाच्या अगर बगमांच्या अंतःपुरांत कोणाचाहि प्रवेश नव्हता आणि या अंतःपुरांतून तर रोजरोज नाना प्रकारच्या गूढ कारस्थानांचा मार्गदर्शक होईल. परंतु उन्मार्ग- — प्राव्हर्ब्स, भाग ११-३.

  • सत्त्वशील मनुष्यांची सचाटीव त्यांनां

गाम्यांचा दुराग्रह त्यांचा अधःपात करील,