Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पापाचे प्रायश्चित्त. २१७ " " मग ती आतां आहे कुठं? लवकर सांगा ! " वगीच्यांत – लखनौ - " सीता लखनौला आहे हें कानीं पडतांच बुंदियेचा जीव किंचित् थान्यावर आला. तिनें झातारीला आतां विचारलें " तुमची ही अशी दशा कुणीं केली ? " ह्यातारीला बोलण्यास मुळींच शक्ति नव्हती. अति कष्टानें अस्पष्ट शब्दांनीं तिनें सांगितले " साधुसिंहाबरोबर आपण कानपुरला जात होतों-साधूनें आपला खून किला-पैसे दागिने सारें बुचाइन तो पळून गेला — " झातारीने आणखीदि कांहीं शब्द उच्चारले, परंतु बुंदियेला ते स्पष्ट समजले नाहींत. तरी तिच्या एकंदर सांगण्याचा आशय बुंदियेला कळून चुकला. साधुसिंदाबरोबर ह्मातारी कानपुरला चालली होती; दागिन्यांची भारी पेटी घेऊन तिच्याने अधिक चालवेना. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस लखनौच्याजवळच एका खेडयांत उभयतांनी लपून काढले. सोमवारी सायंकाळी साधुसिंह आपल्याबरोबर तीन मनुष्यें घेऊन आला. त्या दिवशीं मोठया पहांटेस उठून ही मंडळी कानपुराकडे जवयास निघाली होती. उजाडण्यापूर्वीच रस्त्यांत झातारीचा खून करून तिला जंगलांत टाकून दागिन्यांची आणि मोहरांची पेटी घेऊन साधुसिंह पळून गेला. म्हातारीनें लवकरच डोळे मिटले. आतां बुंदिया अयोध्यानाथाला म्हणाली ह्याच थेरडीनं सीतेला लखनौला नेलं होतं. जयपालसिंहाची राख ती हीच ! 66 बुंदियेचें हें भाषण ऐकतांच अयोध्यानाथ मग तेथे क्षणभरहि थांबला नाहीं. दोघेंहि मोठ्या वेगानें लखनौच्या रस्त्यास लागलीं व दोन प्रहरांच्या सुमारास लखनौला आली.