२२६ ही रामाची अयोध्या ! भीतीनें त्या अगदी गर्भगळित होऊन गेल्या होत्या. या प्रसंगांतून कसे मुक्त व्हावें, हे त्यांनां कांहींच सुचेना. घरांत अन्नसामुग्री भरपूर होती. लखनौला आतां आपल्याला बरेच दिवस रहावें लागेल, अशा समजानें म्हातारीनें दाण्यागोठ्याची पुष्कळ दिवसांची बेगमी करून ठेविली होती; परंतु प्रति पळास भीतीनें थरथर कांपत असलेल्या त्या असहाय पोरींनां जेवणाखाणाची शुद्धिहि नव्हती व शुद्धि असती तथापि त्यांच्यानें अन्न तयार करवले नसते ! मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे की, दर्शनसिंहाच्या मंडळीस बादशहाचे शिपाई लखनौला घेऊन येत असतां रस्त्यांत अयोध्यानाथ आणि काशीनाथ यांची त्यांच्याशी भेट झाली होती. काशीनाथ या शिपायांच्या टोळीबरोबर लखनौकडे चालला होता; परंतु अयोध्यानाथ आणि बुंदिया ह्रीं निराळ्याच रस्त्यानें लखनौला निघालीं होतीं. मंगळवारी सकाळी अयोध्यानाथ आणि बुंदिया ह्रीं वाट चालतां चालता लखनौपासून सुमारें तीन कोसांवर असलेल्या एका दाट जंगलांत आली. ती उभयतां कांहीं रस्ता चालून जाताहेत तो जवळच झाडींत कोणा मनुष्याच्या विव्हळण्याचा शब्द त्यांच्या कानी पडला. अयोध्यानाथाच्या हृदयांत दयेचा संचार होऊन त्या विपद्ग्रस्त मनुष्याची स्थिति पाहून शक्य असल्यास त्याला वांहीं सहाय्य करावें म्हणून जिकडून तो आर्त स्वर येत होता तिकडे ह्रीं उभयतां गेलीं. तेथें जाऊन पहातात तो एक वृद्ध स्त्री मरणोन्मुख अवस्थेत विव्हळत पडली आहे. जागजागी तिच्या शरीरावर तरवारीचे भयंकर बार झाले आहेत व त्या जखमांतून सारखें रक्त चहात आहे. तो हृदयद्रावक देखावा पहातांच अयोध्यानाथ विरघळून गेला. ह्याताया स्त्रीच्या तोंडाकडे दृष्टि जातांच बुदियेने तर एकदम किंकाळीच फोडली. त्या जखमी ह्यातारीला अद्याप थोडीशी शुद्धि होती. बुंदियेला तिनें तत्काळ ओळखलें. " बुंदिया- सोसवत नाहीं ग-प्राण चालला-साधू- दगा-" इत्यादि अस्पष्ट शब्द उच्चारित भयंकर वेदनांनी जखमी झालेली ह्यातारी तळमळू लागली. तिच्या त्या हृदयविदारक वेदना आणि अंतःकरणाचे पाणी करणारा तिचा तो विकळाप बुंदि येच्या ने पहावेना. तीहि एक.सारखी रुदन करूं लागली. रडतरडतच तिनें ह्मातारीला विचारले " माझी सीता कुठं, सीता कुठं आहे ? " ह्यातारी क्षीण स्वरानें ह्मणाली " ती माझ्याबरोबर आली नाही.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२१५
Appearance