ही समाची अयोध्या ! साधुसिंहाच्या शक्तीच्या बाहेर होते. इकडे, ती म्हातारी आणि साबुसिंह यांपैकी कोणाच्यानेंहि ह्या एवढ्या मोठ्या संपत्तीचा मोह तोडबेना. त्याचप्रमाणे दागिन्यांच्या पेटीतहि नाही म्हटले तरी कमीत कमी लाख दीड लाखाचा विषय होता. म्हातारीने बादशहाच्या दरबारात नाचगान करून आणि लखनौंतील •अमीर उमरावांनां सुप्रसन्न करून हे दागिने संपादन केले होते. तिच्या आयुष्याची ही कमाई होती. पुढय़ांत केवढाहि दारुण प्रसंग उभा राहिला तरी एवढ्या भारी • किंमतंच्या दागिन्यांचा मोह का तिच्याने तोडवतो ! उपायांतर नाही असे पाहून भारी किंमतीच्या दागिन्यांप्रमाणे वजनानेंहि भारी असलेली ती पेटी म्हातारीने आपल्या डोक्यावरून नेण्याचे ठरविलें, साधुसिंहानें सुबर्णमेहरांच्या पेटीचा भार आपल्या मस्तकावर घेण्याचे ठरविलें. एवढी तयारी झ ल्यावर म्हातारी कैलासेश्वरीला म्हणाली “कपाळकरंटे ! अझूनहि तूं स्वस्थच बसली आहेस का ? चल ऊठ, तुझ्या दागिन्यांची पेटी घे, अनू पड बाहेर झटपट ! " परंतु मानकुमारीला एकटी टाकून जाण्यास कैलासेश्वरी मुळींच कबूल झाली नाहीं. मानकुमारी हृदयविदारक शोक करित कैलासेश्वरीला आग्रह करूं लागली ." बन्सं ! तुम्ही असा भलताच हट्ट नका करूं गडे यांच्याबरोबर तुझी जा.- माझी अभागिनीची तुझी मुळीच काळजी करूं नका. ईश्वराच्या कृपेनं तुझी आपल्या भावाला भेटलां, तर आपलं हरवलेलं धन पुनः सांपडलेलं पाहून त्यांच्या दुःखाचं थोडंबहुत सांत्वन होईल. तुमची त्यांची भेट झालीच तर त्या अभागिनाच्या मृत्यूची हकीगत तुझी तिकडे कळवा. तुझी इथं राहूं नका ! जाच तुझी यांच्या बरोबर ! " कैलासेश्वरीनें यावेळीं जो हृदयभेदक आकांत मांडिला, त्याचे वर्णन करण्यास आमची लेखणी असमर्थ आहे ! मानकुमारीच्या गळ्यास घट्ट मिठी मारून ती स्फुंदत स्फुंदत ह्मणाली “ वहिनी ! तुला एकटी टाकून मी जाऊं ! या देहांत थोडीशी धुगधुगी असेपर्यंत कांहीं ती गोष्ट माझ्यानं व्हायची नाहीं ! तूं माझी • जन्माची सोबतीण ! माझी आई, बाप, गुरू, हितकर्ती - माझं सर्व कांही तूं – अन् तुला टाकून मी जाऊं ? तुला टाकून मी कर्धीच जाणार नाही ! तुला कारागृहांत घेऊन गेल्यास मीहि तुझ्याबरोबर कारागृहांत येईन! तूं मृत्यु पावल्यास आत्महत्या करून तुझ्या पायापाशीं मीहि प्राण सोडीन ! जिकडे तूं तिकडे मी ! तुला मी कधीहि सोडणार नाहीं ! "
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२१३
Appearance