पापाचें प्रायश्चित्त २१३ दर्शन सिंहानें बगीच्याभोवती ठेवलेले पहारेकरी भयभीत झाले व आपापल्या जीवाचे. रक्षणार्थ वाट फुटेल तिकडे पळून गेले ? दर्शन सिंहाला पकडला त्या दिवशी सायंकाळी दर्शनचा अत्यंत विश्वासू नोकर साधुसिंह घाबयाघुबया बगीच्यांत येऊन त्या वृद्ध स्त्रीस एकातांत भेटून म्हणाला “माईसाहेब, सर्वनाश झाला ! बादशहाने महाराजांस फांशी देण्याचा हुकुम फर्माविला आहे. कहानसाहेब महाराजांस तुरुंगांत घेऊन गेले आहेत. आपणा सर्वोस इथें जी कांहीं संपत्ति, दागदागिने, पैसाअडका आहे तें सर्व घेऊन आज रात्री इथून पळून जाण्यास महाराजांनी सांगितले आहे. " म्हातारीच्या मरतकावर जणों वज्राघात झाला. तिची कंबरच खचली. वेड्यासारखी होऊन ती म्हणाली " आम्ही बायका माणसं. या रात्रीच्या वेळीं कुठं पळतां येईल ? " साधु म्हणाला "मोठाच दुर्धर प्रसंग प्राप्त झाला आहे ! आतां वेळ अवेळ, रात्र अन् दिवस पहाण्याला मुळींच अवकाश राहिला नाही. तुम्ही माझ्याबरोबर आत्तांचे आतां गुप्त वेषाने निघण्याची एकदम तयारी करा. पैसाअडका, दागदागिने जें कांही असेल ते माझ्या हवाली झटपट करा, बाहशहाचे लोक वाडा लुटण्यास आत्तां येतील! " “मान्नाची काय व्यवस्था करायची ? दुखण्यानं ती पोर मरायला पडली आहे. तिला घोड्यावर बसून पळायला कसं येईल ?” " यावेळी त्या अवदसेचा तुम्ही विचारहि करूं नका ! इथेच त्या कारटीला रानांत मरूंद्या. रात्री हिंस्र श्वापदें तिचा फडशा उडवितील. सकाळी तिचें हाडुकहि इथे दिसणार नाहीं ! ” ह्यातारी या वेळीं अगदींच गांगरली होती. तिने विचारले "बादशहानं फांशींचा हुकुम कां बरं दिला ?” साधु म्हणाला " बुंदियेची पोरगी गंगा हिला बेगेमच्या अंतःपुरांत पाठविल्यामुळे हा सारा घोटाळा झाला. [१५] आतां अधिक विचार करण्यास अवकाशच उरला नव्हता. घाईघाई करून म्हातारीने आपल्या दागिन्यांची पेटी आणि मोहरांनी भरलेली एक मोठी पेटी बाहेर काढली. या पेटींत सुमारें पांच हजार मोहरा होत्या. म्हातारीनें जयपालाल लुबाडून हा धनसंचय केला होता. ह्या दोन्ही भारी वजनाच्या पेट्या उचलून नेणे
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२१२
Appearance