या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
भारत रमणी दौल्याला वाटत होतें कीं, दर्शवसिंहाचा वाडा जमीनदोस्त करून त्याची सर्व जमीन खणून पाहिली ह्मणजे कोर्डेतरी लपविलेली संपति सांपडेल, यासाठीच तो वेळोवेळी बादशहाला ह्मणत असे कीं " दर्शनसिंहाचा न्याय कुराणाप्रमाणे झाला. पाहिजे. दुष्मनाच्या घराचा तलाव करावा. " या कुराणाच्या आज्ञेचा अर्थ असा कीं, त्याचें घरदार जमीनदोस्त करून तेथे जमीन खणून खरोखरचाच तलाव बनविला पाहिजे. आपण पाठविलेले लोक अगदी थोडे होते आणि त्यांनी वाड्याची जमीन केवळ वरवरच खणली. तेथे खरोखर तलावच करावयास पाहिजे होता !