Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत रमणी.. २०५ काशीनाथाला या गोष्टीचे स्मरण होऊन तो अयोध्यानाथाला आतुरतेनें म्हणाला " अयोध्यानाथ ! मला वाटतें, मानकुमारीच्या युक्तीनें दर्शनसिंह व त्याचें सर्व कुटुंब यांची अशी दुर्दशा उडाली असावी! दर्शनसिंहासारखा नीच, पापी, अधम तोच! त्या राक्षसाच्या एक एक भयंकर कमोचें स्मरण झाले म्हणजे अंगाची लाही होऊन जाते! त्याच्यासाठीं कुणालाहि दुःख होणार नाहीं. उलट, त्याला पापाचें योग्य प्रायश्चित मिळाले असे वाटून सर्वांनां फार आनंद होईल ! परंतु दर्शनसिंहाच्या निरपराध स्त्रिया, मुले व त्याचा वृद्ध पिता यांची मला फार कीव येते ! त्यांनां वांचविण्याचा प्रयत्न आपल्याला वेला पाहिजे. चला, आपण यांच्याबरोबर लखनौला जाऊं ! " दर्शनसिंहाच्या कुटुंबाची दुर्दशा ऐकून अयोध्यानाथाचें कोमल हृदय तत्क्षणीं विरघळले. काशीनाथाच्या ह्मणण्याला त्याने ताबडतोब संमति दिली; परंतु त्या काळस्वरूपी शिपायांनां पाहून भीतीनें बुंदिया रडूं लागली! तिचें सर्व शरीर भयानें थरथर कांपूं लागले ! त्या शिपायांबरोबर जाण्यास ती कांहीं केल्या कबूल होईना; परत कानपुरास जाण्याविषयीं हट्ट घेऊन बसली ! काशीनाथानें अनेक गोष्टी सांगून मोठ्या कष्टानें तिची समजूत घातली! अयोध्यानाथ आणि बुंदिया वहीं निराळ्या रस्त्यानें लखनौला जावयाला निघालीं व काशीनाथ त्या शिपायांच्या बरोबर निघाला. काशीनाथ व त्याच्या बरोबरची मंडळी दर्शनसिंहाच्या वाड्यापासून सुमारें पांचसहा कोस गेल्यावर दिवस मावळला. रात्रीं तेथेच तळ देण्याचें शिपायांनी ठरविलें. शिपाईलोक आपापल्या भोजनाची व्यवस्था करूं लागले. कोणी दगडाच्या चुली घालू लागले, कोणी जवळच्या झन्याचे पाणी आणूं लागले, कोणी डाळरोटी तयार करण्याच्या तजविजीस लागले. दर्शनसिंहाचीं मुले व स्त्रिया एके ठिकाणीं •एका झाडाखाली बसली होतीं. दर्शनसिंहाचा बाप जयपालसिंह एका सामानाच्या गाडीत मृतप्राय पडला होता. दर्शनसिंहाच्या कुटुंबांतील मंडळीशीं बोलावयाला ही संधि ठीक आहे, असें काशीनाथाला वाटले; परंतु या प्रसंगी त्यांच्याशी काय बोलावें, व कसें बोलावें, · याची त्याला मोठी पंचाईत पडली ! त्यांच्यावर नुकताच आलेला घोर प्रसंग, त्यांना झालेली मारहाण, त्यांनां सोसाव्या लागलेल्या यातना व अपमान यांचें दुःख त्यांच्या मनांत अगदीं ताजें होतें ! त्यांच्याशी कांहीं बोलावयाचें ह्मणजे