Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत रमणी. २०१ रोषन-उद्-दौल्यःच्यापुढे पडली आहे. दर्शनसिंहाच्या मस्तकावरील पांच हजार रुपये किंमतीचा सोनेरी मंदिल एकजण मेहतर आपल्या पायांखाली तुडवित आहे ! दर्शन सिंहाचा शिरच्छेद करण्यापूर्वी त्याचा मंदिल मेहतरांकडून पायाखाली तुडवावा, व त्याच्या बंदुकीचे आणि तरवारीचे मोडूनतोडून तुकडे करावे, असा बादशहानें हुकूम केला होता ! दर्शनसिंह मलिन वस्त्र नेसून सामान्य शिपायाच्या खाटल्यावर उघडाबोडका अधोमुख बसला होता. अधिकाराच्या तोऱ्यांत अनन्वित कमें करून सर्वोकडे तुच्छतेनें पहाणारा दर्शनसिंह तो हाच काय ! बादशहाचा इंग्रज शिक्षक ऊर्वश्वासानें घोडा दौडित दौडित कारागृहापाशी येऊन पेंहाचल्यावर त्य'नें ताबडतोब नबाब रोषन-उद्-दौल्याला बादशहाचा हुकूम सांगितला. हा हुकूम ऐकतांच रोषन-उद्-दौल्यानें वरवर खूब आनंद झाल्यासारखे दाखविलें, परंतु तो मनांत अत्यंत दुःखित झाला ! दर्शनसिंहाला कारागृहांत नीट बंदोबस्तानें कोंडून ठेवून तो आपल्या घरी निघून गेला. • नबाब रोषन-उद्-दौला निघून गेल्यावर शिक्षकानें गुप्तपणें कारागृहांत प्रवेश केला. त्याला पहातांच दर्शनसिंह गद्गद कंठाने म्हणाला "भाई! मुलकेजामानियांच्या टोपीला भेक असे जे मी ह्मणालों, ते केवळ लोकांनां हंसविण्यासाठी बादशहाला काय ठाऊक नाहीं, कीं, त्याच्या बापाने आणि चुलत्यांनी त्याला अयोध्येची गादी मिळू नये म्हणून जेव्हां प्रयत्न चालविले होते, तेव्हां इंग्रज रेसिडेंटला दोन कोट रुपये भरून कार्यसिद्धि करून घेण्याची मसलत पहिल्याप्रथम त्याला मींच दिली होती तें! रेसिडेन्सींतील कारभारी गुलाम हुसेनखां, याच्याशी संधान कोणी बांधिले ? भाई ! बादशहा माझा प्राण खचित घेणार ! रोषन माझा कट्टा शत्रु आहे. तो बादशहाला भर दिल्याखेरीज रहाणार नाहीं. मी मृत्युबद्दल मुळींच डरत नाहीं ! परंतु मला माझ्या मुलांमाणसांबद्दल दुःख होत आहे. तुझा इंग्रजांनां ह्मणे स्त्रियांविषयों अत्यंत आदरभाव असतो. तेव्हां मित्रधर्माला जागून माझ्या मृत्यूनंतर माझ्या स्त्रीपुत्रांचे रक्षण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यांचे रक्षण करण्याविषयीं रेसिडेंट साहेबांला माझ्यातर्फे तुम्ही विनंति करा. कसा झालों तरी मी शिपाईगडी आहे. शिपायांची मारहाण मी आनायासानें सहन करीन; परंतु माझ्या स्त्रिया, माझ्या मुली, आंथरुणाला खिळलेला माझा वृद्ध पिता, आणि माझे दोघे मुलगे यांना मारहाणीचें दुःख व यातना कधीहि सहन होणार नाहीत. रोषन माझें