भारत रमणीहुणे मराठी ग्रंथालय चादशहाच्या हुकुमाप्रमाणे एका क्षणाचाहे विलंब न करितां रोषन -उद्-दौल्यानें नारायण पेठ, पुणे २ "बादशहाच्या बॉडी गार्डाच्या ( शरीररक्षक ) कॅप्टनला दर्शनसिंहाच्या हातापायांत चिडया घालून कारागृहांत घेऊन जाण्याबद्दल हुकूम केला. त्याप्रमाणे कॅप्टन दर्शनसिंहाला घेऊन ताबडतोब कारागृहाकडे निघाला. इकडे बादशहा रागानें अगदी लाल होऊन गेला होता. जमिनीवर जोरानें पाय आपटून तो ओरडला " संध्याकाळ व्हायच्या पूर्वी याचा शिरच्छेद झाला पाहिजे ! रोषन ! ऐकलेंस ? या बदमाष दर्शनसिंहाचा शिरच्छेद आज सायंकाळचे आंत झाला पाहिजे ! दर्शनसिंहाला तुरुंगांत पाठविल्यावर रोषन-उद्-दौला त्याच्या शिरच्छेदाची व्यवस्था करण्याकरितां ताबडतोब गेला. बादशहाहि हत्तीवर बसून राजवाड्याकडे "निघून गेला. राजा दर्शनसिंहाला कोणत्या अपराधावरून कारागृहांत पाठविले, तसेंच त्याला प्राणदंडाची शिक्षा कां झाली, हें नासीरच्या इंग्रज दोस्तांनां कांहीं केल्या कळेना! परंतु नासीरला यासंबंधी प्रश्न करण्याची छाती एकालाहि झाली नाहीं. नासीरचा बाप गाजीउद्दिन हैदर हा नासीरचा पुत्र म्हणून स्वीकार करण्यास कबूल नव्हता. लोकांत असा प्रवाद होता कीं, तत्कालीन इंग्रज रेसिडेंटला - नासीरने दोन कोट रुपये देऊन अयोध्येची गादी प्राप्त करून घेतली. 'मुलके जामानियांच्या टोपीला भोक' या दर्शनसिंहाच्या शब्दांचा नासीरने असा अर्थ केला कीं 'मुलके जामानियांनां राजमुकुट न्यायाने मिळालेला नाहीं- त्यांच्या राजमुकुटांत छिद्र आहे ! मुलके जामानिया हे कांहीं गादीचे खरे वारस नव्हत! ' दर्शनसिंहाच्या शब्दांचा बादशहाने याप्रमाणें अर्थ करून त्याला राजद्रोही ठरवून त्याचा शिरच्छेद करण्याचा हुकूम केला. नासीर हा अयोध्येचा स्वतंत्र बादशहा होता. आपल्या राज्यांतील प्रजेसंबंधी वाटेल तसा व्यवहार करावयाला त्याला पूर्ण अखत्यारी होती. गव्हर्नर जनरल किंवा अयोध्येतील इंग्रज रेसिडेंट यांन त्याच्या हुकुमांत हस्तक्षेप करण्याचा मुळींच अधिकार नव्हता. फक्त इंग्रज अधिकारी किंवा अयोध्येतील इंग्रज रहिवासी यांनां कांही शिक्षा करावयाची असल्यास मात्र बादशहाला इंग्रज सरकारची परवानी घ्यावी लागे ! राजा दर्शसिंहाला बादशहानें प्राणदंड केला, ही बातमी इंग्लिश रेसिडेंटच्या कानांवर गेली; परंतु बादशहाच्या हुकुमांत हात घालावयाचें त्यानें साफ नाकारलें ! या कामांत इंग्रजसरकारला हात घालण्याचा मुळींच अधिकार नाही, असे त्यानें स्पष्ट सांगितले !
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१९८
Appearance