ही रामाची अयोध्या ! राजा दर्शनसिंह हाच नासीरच्या खास दरबारचा विदुषक होता. वास्तविक इंसावयाला खरें कारण नसतांहि नबाब रोषन-उद्-दौला सर्वांच्या अगोदर हंसून बादशहाचे प्रियपात्र होण्याचा यत्न करित आहे, असे पाहून राजा दर्शनसिंह त्याच्यावर ईषेनें अगदर्दी जळू लागला. आपल्या रसिकतेचें प्रदर्शन करून सर्वांनां आपण हंसवावें व रोषन-उद्-दौल्यावर कडी करून दाखवावी, या हेतूनें दर्शनसिंह मोठ्याने ह्मणाला " मुलके जामानियांच्या टोपीला भोंक ! ” (
- मुलके जामानियांच्या टोप.ला भोंक' हे शब्द दर्शनसिंहाच्या तोंडांतून
निघतात न निघतात, तोंच बादशहा खदिरांगाराप्रमाणे लाल डोळे करून रागानें त्याच्याकडे पाहूं लागला. इतर दोस्तांनीहि हंसावें ह्मणून तोंड उघडलें होतें; इनक्यांत बादशहाचा रंग पाहून त्यांनी आपल्या हातांनी तोंड दाबून धरिलें ! समोरच्या मेजावर जोराने हात आपटून नासीर मोठ्याने ओरडला "रोषन ! रोषन ! या साल्या बंडखोराला येथल्या येथे बांधून ताबडतोब तुरुंगांत घेऊन जा आणि याचा शिरच्छेद कर ! " याप्रमाणे बादशहाला एकाएकी कोपाविष्ट झालेला पाहून सर्वानां फार आश्चर्य वाटलें ! परंतु इतर कोणाशीं एक शब्दहि न बोलतां बादशहाने राजा दर्शनसिंहाच्या हातापायांत लोखंडी बिडया ठोकण्याबद्दल रोषन-उद्-दौल्याला हुकूम केला.*
- His capricious Majesty has just degraded his chief
favourite —the Sejanus of Lucknow, the Maharaja Dursun Sing, who has been put in chain, his food defiled, and his turban removed and kicked by Mehturs. His relations and followers have all likewise been disgraced, and new daro - gahs appointed to his numerous offices. The Prime Minis- ter, his bitterest enemy is living in one of the apartments of the palace, to be in immediate attendance on the king, and every moment dreading a similar ebullition of wrath from his royal master. This state of things arises, it is supposed, from an intrigue with the exiled qucen Mother. -- Asiatic Journal, April 1836, Page 261.