Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत रमणी. तीरावरील उद्यानांत पोहोचल्यावर बादशहा आपल्या टोपीच्या छिद्रांत बोट घालून बोटाभोंवती टोपी फिरवूं लागला ! अझूनपर्यंत कोणाच्याहि तोंडांतून विनोदात्मक अशी एकहि गोष्ट निघाली नव्हती. अझून हास्याच्या हिः हिः शब्दाला आरंभ झाला नव्हता ! हंसावयाला कशी तरी संधि सांपडावी, म्हणून जो तो इकडे तिकडे पाहू लागला; परंतु हास्यरसाला उद्दीपक अशी कांही गोष्ट किंवा घटना कोणाच्याच दृष्टीस पडेना ! नबाब रोषन-उद्-दौला तर किती वेळ तरी हंसावयाकरितां तोंड वासून तयार होऊन राहिला होता ! बादशहाच्या तोंडांतून लहानसें तरी माँजेचें भाषण बाहेर पडतें कर्धी आणि सर्वांच्या अगोदर दांत विचकून इंसुन आपल्या रसिकतेचें व गुणग्राहकतेचें प्रदर्शन आपण करितों कध, असे त्याला होऊन गेलें होतें ! परंतु सर्वांच्याच दुर्दैवानें आज बादशहानें अगदी मूकव्रत धारण केले होते! पूर्वीच्या दरबारांतील विदुषकांप्रमाणे किंवा मैत्रेयांप्रमाणे नित्य नव्या नव्या हास्यविनोदाच्या गोष्टी सांगणे सर्वांनांच साध्य नसतें ! नासीरच्या खास दरबारांत तशाप्रकारचा कोणी रसिक, विनोदी विदुषक किंवा मैत्रय नव्हता; आणि ह्मणूनच ख्यालीखुशालीच्या किंवा नाचरंगाच्या वेळी अनेक लावण्यवती नवयौवना रमणी नासिरुद्दिनाच्या सभोवतीं बसत असत ! बादशहाच्या खास दरबारांत खऱ्या विनोदाच्या भाषणाने जरी हंशा पिकत नसे, तरी बादशहाच्या भोवती बसलेल्या रमणीगणांच्या अश्लील हावभावांनी तेथील सभासदांची हंसतां हंसतां मुरकुंडी वळे ! तेहि साधलें नाहीं, तर निदान त्यांच्या तोंडाकडे पाहून तरी सभासदांनां हंसण्याची संधि मिळे ! परंतु या वेळीं उद्यानांत त्या तन्वंगी रमणीवृंदाच्या ऐवजी दाढी मिशीवाले मोठे मोठे लह साहेब बादशहाच्या भोवती बसले होते! त्यांनां पाहून भीतीनें मनुष्यांची प्लीहाच फुटावयाची- मग हंसूं करें येणार ? अर्थात्, या वेळच्या बैठकीतून हास्यरसाला अगदीच हद्दपारी झाली होती ! शेवटीं, शोधतां शोधतां नबाब रोषन- उद्-दौल्याला एकदाचें हंसावयास कारण मिळालें ! नासीर आपल्या अंगुलीभोवत टोपी फिरवित आहे, हे पाहून ही हंसावयाला चांगली संधि आहे अर्से त्याला वाटलें हें व तो "वहावा ! वहावा ! क्या बात है ! क्या मजा है ! " असें ह्मणून फिदिफिदि ! हंसावयाला लागला ! वजिराची रसिकता पाहून बादशहानेंहि किंचित स्मित करून आपली गुणग्राहकता व्यक्त केली ! आतां आपण हंसलों नाहीं, तर आपण आपले 'कर्तव्य केले नाही असे होईल, असा विचार करून बादशहाचे इतर ' आपके वास्ते " दोस्तहि खदखदा हंसूं लागले !