राठी ग्रंथाले भारत रमणी. अधिकार नव्हता. ताजमहाल बेगमेची शिबिका साधारण पालखीप्रमाणे किंवा मेण्याप्रमाणे नव्हती; तर ती एका लहानशा घराप्रमाणे प्रचंड होती ! डोकीवर सोनेरी मंदील व अंगावर एकजात उत्तम प्रकारचा पोषाख घातलेले. वीसजण भोई बेग मेची शिबिका खांद्यावर घेऊन चालले होते. ही शिबिका उत्तम रीतीने शृंगारली होती. तिला सुवर्णांचें नक्षीदार काम केलेले झिरझिरित पडदे लाविले होते. या शिबिकेंत आपल्या एकदोन प्रिय मैत्रिणींसह बेगम बसली होती. शिबिका वाहणाऱ्या भोयांच्या मागून सुंदर वस्त्रालंकारांनी मंडित अशा वीस दासी चालल्या होत्या. बेगमेची स्वारी दरग्याच्या दरवाजाशी पोहोचली, की शिबिका आपल्या खांद्यावरून दरग्यांत नेण्याचे काम या दासींचें होतें. या वीसा दासींच्या मागून रुप्याच्या काठ्या हातांत घेऊन सुमारे पंधरा भालदार, चोपदार चालले होते. आणि स्वारीच्या अगदीं पिछाडीस सुंदर रीतीनें शृंगारलेल्या एक हत्तीवर हौद्यांत बसून अंगावर सोनेरी पोषाख घातलेले व डोकीला स्वर्णखचित मंदिल असलेले ताजमहाल बेगमेचे मुख्य मुख्य खोजे चालले होते. अशा थाटानें बेगमेची स्वारी आज हजरत अब्बासच्या दरग्याच्या दर्शनास निघाली होती ! थोड्याच वेळांत बेगमेची स्वारी दरग्यांत जाऊन पोहोचली. कांहीं वेळाने नमाज पढण्यास प्रारंभ झाला. पुत्रकामना मनांत धरून बेगमेनें भक्तिभावपूर्वक परमेश्वराची प्रार्थना केली. बेगमेची स्वारी राजवाड्यांत परत जातांना रस्त्यांत जमलेल्या हजारों अनाथ अपंगांनां व भणंग भिकाऱ्यांनां बेगमेनें निश्चित केलेल्या मासिक दानासंबंधी दहा हजार मोहरांची खैरात झाली! प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दहा हजार मोहरा दान करून ताजमहाल बेगम हजारों गरीब दुबळ्यांचा दुवा घेत असे. नूनाच्या दुसऱ्या दिवसच्या भेटीनंतर गेल्या तीन दिवसांत नासीर महालाच्या बाहेर मुळींच आला नाहीं. बादशहाच्या खास दरबारांतील दोस्त मंडळीला वाटत होतें कीं, नासीर नूनासह अनेक भोगविलासांत निमग्न होऊन गेल्यामुळे गेल्या तीन दिवसांत त्याला रंगमहालाच्या बाहेर यावयास मिळाले नाही ! परंतु 'अंदरकी बात' फक्त सर्फराजखां व बादशहा यांनांच माहीत होती ! आज ताजमहाल बेगम हजरत अब्बासच्या दरग्यांत गेल्यावर नासीर तिच्या महालांत गेला. इकडे, खास दरबारच्या दिवाणखान्यांत त्याचें दोस्त पंचायतन त्याची वाट पहात बसलें होतें. ताजमहाल बेगम परत यावयाच्या अगोदर थोडा वेळ बादशहा तिच्या महालांतून बाहेर पडला. नासीरनें बेगमेची भेट घेतली नाहीं !
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१९४
Appearance