१९२ ही रामाची अयोध्या ! मी ह्मणतों कीं, उलट अहित मात्र होण्याचा फार संभव आहे ! आह्मी स्वदेशांत गेलों, ह्मणजे प्रत्येकाच्या भोवती जमणाऱ्या अनेक शिष्यमंडळीच्या द्वारा एक एक नवा संप्रदाय उत्पन्न होईल ! आपल्या देशांत अगोदरच अनेक धर्म आणि शेकडों संप्रदाय आहेत, त्यांत आमच्या योगाने आणखी पांचदहा नवीन संप्रदायांची भर पडेल ! एका संप्रदायाच्या लेकांचा दुसन्या संप्रदायाच्या अनुयायांशी हिंस्र पशूंप्रमाणे व्यवहार असतो ! मुसलमान हिंदूंनां पाण्यांत पहातात, हिंदु मुसलमानांचा द्वेष करितात आणि हिंदुमुसलमान दोघेहि ख्रिश्चन लोकांचा तिटकारा करितात ! भिन्न भिन्न संप्रदायांची धर्मसाधनपद्धति, आचार आणि बाह्य व्यवहार भिन्न भिन्न प्रकारचे असतात. या बाह्य व्यवहारामुळेच या संसारांतील धर्म आणि लोक वेगळे दिसतात. परंतु बेटा ! पृथ्वीवरील सर्व धर्माचें तत्त्व आणि सारांश एकच आहे ! ईश्वरप्राप्तीविषयांचा प्रयत्न - हाच सर्व धर्माचा निष्कर्ष आहे ! या संसारांत धर्माचें केवळ आवरण ह्मणजे बाह्य व्यवहार उघड दृष्टीस पडतो; परंतु या निर्जन हिमाचलांत प्रवेश केल्याशिवाय धर्माच्या निष्कर्षाचा लाभ कोणाला कधीहि होणे शक्य नाही. या ठिकाणी संसारांतील आचारव्यवहार, रीतिनीति, देणेघेणें कांहीं नाहीं. संसारापासून निर्लिप्त होऊन साधु शुद्ध चित्तानें हिमाचलावर आरोहण करितात. ह्मणून येथे मतभेद, धर्मयुद्धे उपस्थित होण्याचे कारण नाहीं ! परंतु जन्मल्याबरोबर कोणाला हिमाचलावर आरोहण करितां येणें शक्य नाहीं. संसार हें एक उत्कृष्ट विद्यालय आहे! धैर्य, सहिष्णुता, आत्मयज्ञ आणि निष्ठा यांचे शिक्षण प्रथम संसारांत राहूनच संपादन केले पाहिजे. संसारांत राहून मिळविण्याचें हें शिक्षण संपादन करण्यापूर्वीच येथें आलें, तर त्यापासून विशेष लाभ होत नाहीं. याचसाठीं तुझ्या पितामहानें तुला स्वदेशांत परत जावयास इतक्या आग्रहानें सांगितलें !” साधूचें हें भाषण पुरे झाल्यावर युवक त्या साधूला आत्मपरिचय करून देऊ लागला; साधु किंचित् हास्य करून म्हणाला " बेटा ! तुला मी ओळखलें आहे ! तूं सीतापुरचे गंगाप्रसादशास्त्री यांचा पुत्र - तुझें नांव काशीनाथ ! 39 काशीनाथ ह्मणाला " मी आतां लखनौला जायचा मनांत विचार केला आहे. प्रभो ! आणखी किती दिवसांनी माझ्या पळवून नेलेल्या बहिणीची मी मुक्तता करूं शकेन, ते आपण कृपा करून मला सांगा. आपण सर्वज्ञ आणि सर्वदर्शी आहां, अशी माझी पक्की खात्री आहे !
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१९१
Appearance