शानिकेतन. त्या तरुण पुरुषाच्या अत्यंत आग्रहाला मान देऊन तो साधु आपली हकीगंत त्याला सांगू लागला. तो ह्मणाला "बेटा! माझ्या आयुष्याच्या पूर्वावस्थेला विस्मृतिसागरांत बुडवून टाकण्याचा मी आटोकाट प्रयत्न करित आहे; परंतु तुझा अतिशयच आग्रह पाहून तुझें मन मोडाक्याचें नाही एवढ्याकरितांच मी तुला माझी हकीगत सांगतो. मी सीतापुरचा प्रसिद्ध ज्योतिर्विद् पंडित शंभुप्रसाद याचा वडील मुलगा. माझें नांव पंडित देवीप्रसाद देशप्रचालित कुसंस्कार आणि जात्यभिमान यांच्या योगाने मी घोर पापार्णवांत बुडून गेलो होतो; परन्तु परमेश्वराची कृपा म्हणून केवळ शुद्ध साधुभक्तीने मला या ठिकाणी आणिलें, आमच्या जहागिरीच्या कर देण्याच्या संबंधांत नबाबाच्या तालुकेदारानें आमच्या घरांतील स्त्रियांवर भयंकर अत्याचार केला. मुसलमानांचा स्पर्श ह्मणजे दारुण पाप होय, असा आमच्या मनावर चिरसंस्कार झाला असल्यामुळे आमच्या घरांतील सर्व स्त्रियांनां आत्महत्या करण्याची मीं सल्ला दिली. माझ्या सल्लेप्रमाणें त्या सर्वोनों शरयु नदीत आत्मविसर्जन केलें. माझा लहान भाऊ तालुकदाराचा सूड उगविण्याच्या इच्छेने परवश होऊन ठगांच्या टोळींत शिरला आणि मी साधुसंगतीचा लाभ घ्यावा ह्मणून हिमाचलावर आलो. " बेटा ! माझा लहान भाऊ पंडित बलदेवप्रसाद याने अनेक शास्त्रांचे अध्ययन केले होते; परंतु केवळ व्यवसाय करण्याच्या हेतूनेंच जर शास्त्राध्ययन केलें तर त्यापासून उपकार न होतां अपकारच व्हावयाचा ! बलदेवप्रसाद हा अतिशय अभिमानी होता. घरांत मुसलमानांचा प्रवेश झाला - भ्रष्टाकार माजला, आतां लोकसमाजांत आपली निंदा होईल, इतर ब्राह्मण आह्मांला जातीतून बहिष्कृत करतील, या शंकांनी त्याचे मस्तक फिरल्यामुळे त्यानें आपल्या सोन्यासारख्या दोघां मुलींनां आत्महत्या करावयास सांगितले ! आमच्या मनांत कुसंस्काराची मुळे खोल गेल्यामुळे आह्मा दोघां बंधूनीं स्त्रीहत्या आणि आत्महत्या या अतिशय भयंकर पापांनां सहाय्य केलें. ठग किंवा दरोडेखोर लुटारू यांनां आह्मी घोर पापी असे समजतों; परंतु कुसंस्कार आणि जात्यभिमान यांच्या योगानें कधीं कधीं आह्मी ठगांपेक्षांहि अधिक निष्ठुर होतों ! आमच्या घरांतील लक्ष्मीतुल्य स्त्रियांनां आत्महत्या करावयास सांगून आह्मीं दोघां भावांनी घोर पापाचरण केल्याचें श्रेय मात्र संपादन केलें ! Sw " बेटा ! तूं मला स्वदेशांत परत जावयास सांगतो आहेस; परंतु माझ्याप्रमाणे पांचदहा लोक स्वदेशांत गेले असतां त्यापासून देशाचें काय हित होणार आहे ?
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१९०
Appearance