Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राक्कथन. २३ pearl larger than the one above it. She had a nose-ring also, with large round pearls and emeralds; and her neck- laces were too numerous to be described. She wore long sleeves open at the elbow, and her dress was a full petti- coat with a light body attached, and open only at the throat. She had several persons to bear her train when she walked and her women stood behind her couch to arrange her head-dress, when, in moving, her pearls got entangled in the immense robe of scarlet and gold she had thrown around her. "" वरील वर्गनावरून या विलासी नबाबाच्या वैभवाची वाचकांस थोडीशी कल्पना होईल. या ताजमहाल वेगमेच्या आणि मुक-अद्-दर-औलिया या आंग्ल युवतीच्या लावण्यास आणि वैभवास दिपवून टाकण्यासारख्या अफजल महाल, मलिका- झमानी, कुदसिया सुलतान प्रभृति अनेक बेगमा व या बेगमांहूनहि रूपवान् अशा अनेक विलासदासी नासिरुद्दीनाचा रंगमहाल प्रकाशवित होत्या. या नासिरुद्दीन हैदराच्या कारकिर्दीच्या काळांतच आमच्या कथानकास आरंभ होत असल्यामुळे नासिरुद्दीनाच्या चरित्राविषयीं येथें थोडासा उल्लेख करणें आवश्यक आहे. नासिरुद्दीनाच्या बापाच्या वेळींच अयोध्येत अंतःकलह, फितुर, स्वार्थपरायणता, भ्रष्टाचार यांचें बीजारोपण झाले होते. नासिरुद्दीन गादीवर आला त्यावेळीं त्याच्या खजिन्यांत बारा कोटी रुपये शिल्लक असून तो ऐन उमेदीत झणजे पंचविसांच्या घरांत होता. तो विलासप्रिय, दिलदार, भोळ्या स्वभावाचा आणि अप्रबुद्ध राजा असल्यामुळे, खुशामती, स्वार्थसाधु, हलकट अशा मंडळीने त्याला भारून टाकले. वुल्यम नाईट नामक त्याच्याच पदरच्या एका चित्रकारानें

  • Private life of an Indian King' नामक पुस्तकांत या राजविलासी

व चैनी नबाबाच्या अनेक विलक्षण गोटी वर्णन केल्या आहेत. आपले केस विंचरण्यासाठी व स्मश्रु करविण्यासाठी नासिरुद्दीनानें रेसिडेन्सींत नाणावलेल्या De Russett नांवाच्या एका न्हाव्यास पदरों बाळगिलें होतें. ह्या न्हाव्यावर हुजुरांची पुढे इतकी बद्दाल मर्जी झाली कीं, त्याच्याशिवाय नासिरुद्दीनास क्षणभरहि चैन पडत नसे. 'सर्फराजखान' अशा मोठ्या मानाची पदवी देऊन त्यानें या फिरंगी हजामाला दरबारांत अग्रस्थानी नेऊन बसविलें. ह्या हजामाशिवाय