Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ ही रामाची अयोध्या ! मदर्दीतून वर काढिले. मी शुद्धीवर आल्यानंतर तो महात्मा मला स्वदेशास जाण्या- विषयीं आग्रह करूं लागला; परंतु मी त्याचे चरण घट्ट धरून रडत रडत ह्मणालों ‘ प्रभो ! मी आपले चरण सोडून दुसरीकडे कुठेंहि जाणार नाहीं. आपण निष्ठुर होऊन मला आपल्या चरणांपासून जर घालवून लाविलें तर मी पुनः आत्महत्या केल्याखेरीज राहणार नाहीं.' तो महात्मा केवळ दयेचा सागर होता. माझ्यावर सदय होऊन आपल्याबरोबर मला घेऊन तो या पर्वतावर आला. त्या महापुरुषा- बरोबर मी ज्या स्थानीं गेलो होतो तेथें मनुष्यमात्राचा प्रवेश होणें असंभवनीय होते! परंतु त्या महात्म्यानें योगबलानें अलौकिक शक्ति संपादन केली असल्यामुळे केवळ त्याच्याच कृपेनें आणि सहाय्यानें मी तेथें गेलों. त्या महात्म्याचा अध्यात्मिक उपदेश आणि त्याची अद्भुत कृत्ये पाहून तो सर्वज्ञ आणि सर्वदर्शी महापुरुषा- असावा, असे मला वाटू लागले आणि म्हणून माझ्या पळवून नेलेल्या भगिनीच्या मुक्ततेविषयीं मी त्याला सर्वकाळ प्रश्न विचारून त्रास देत असें. मी त्या महापुरुष- बरोबर जवळजवळ एक वर्षपर्यंत होतों. तो मला सर्वकाळ स्वदेशीं निघून जाण्यास सांगे. पण मी कांहीं केल्या त्याला सोडून जाण्यास कबूल झालों नाहीं. शेवटीं तो महात्मा मला म्हणाला 'तूं काळजी करूं नकोस. तुझी बहीण सिंहाच्या गुहेतून आणि व्याघ्राच्या मुखांतून सुरक्षितपणें घरीं परत येईल.' या त्याच्या आश्वासनावर निर्धार ठेवून मी आतां स्वदेशीं जात आहे. " "" युवकाची आत्मकथा पुरी झाल्यावर तो साधु म्हणाला " बेटा, ज्योतिषशास्त्र मिथ्या नाहीं. तुझ्या पितामहाशीं तुझी गांठ पडली ! कुठे ? " 60 “ ज्या महापुरुषानें तुला नदींतून वर काढलें, तोच महापुरुष तुझा पितामह जगन्नाथशास्त्री ! ” 2 " ते जर माझे पितामह असते, तर मला आपली ओळख न देण्याचें त्यांनां काय कारण होतें ? ” " बेटा ! निर्वाणपदाकांक्षी महापुरुष कर्धी कोणाला आत्म करून देत असतात काय ? ते संसाराच्या कार्यामध्ये कधीहि हस्तक्षेप करू इच्छित नाहीत. या जगांतील आपत्ति, शाक, ताप इत्यादि घटनेकडहि ते मुळींच लक्ष्य देत नाहीत !" तर मग त्यांनी मृत्यूपासून माझी सुटका कां केली ? ” ·46