Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शान्तिनिकेतन अशा प्रकारें त्या तरुण पुरुषाचें त्या साधूशीं संभाषण चाललें असतां त्याला अकस्मात् स्मरण झालें, कीं, हा साधु सीतापुरांतील एक प्रसिद्ध ज्योतिर्वेत्ता होता परंतु त्याचें नांव काय, हे मात्र त्याला अनेक प्रयत्न करूनहि आठवेना ! कांहीं वेळ स्तब्ध राहून युवक त्या साधूला ह्मणाला “ प्रभो ! मजपासून आत्मगोपन करण्याचा आपण उगीच प्रयत्न करित आहां ! आपल्याला मी आतां ओळखलें; परंतु आपले नांव मात्र अझून आठवत नाहीं. आपण सीतापुरांत प्रसिद्ध ज्योतिर्वेत्ते होतां ! आपण एकदा गणित करून सांगितले होते की, माझे पितामह जगन्नाथशास्त्री हे अद्यापि जिवन्त आहेत आणि ते मला लवकरच भेटतील; परंतु महाराज ! आपलें हैं भविष्य खोटें झालें. त्यांच्याशी माझी गांठ अझूनपर्यंत पडली नाहीं.” साधु किंचित् हंसून ह्मणाला " वेटा ! शास्त्रसिद्ध भविष्य खोटें होणें कर्धीहि शक्य नाहीं. तुझे पितामह जगन्नाथशास्त्री यांच्याशी तुझी भेट खात्रीने झाली आहे ! " युवक गद्गद स्वरानें ह्मणाला " प्रभो ! आपण मला मिथ्यावादी असें मनांत समजत आहां; परंतु मी आपल्याला निश्चयपूर्वक सांगतों की, माझ्या पितामहाशीं माझी गांठ कधीहि पडली नाहीं ! "" साधु पुनः दृढतेनें ह्मणाला " तुझी त्यांची भेट खात्रीनेच झाली आहे; परंतु तूं मात्र त्यांनां ओळखले नाहींस. " तरुण किंचित् हंसून ह्मणाला " प्रभो ! या आपल्या भाषणाला मजजवळ कांहीं उत्तरच नाहीं ! मी दोन वर्षांचा होतो तेव्हां ते संसार परित्याग करून कोठें निघून गेले. अर्थात्, ते मला ओळखित नसतील आणि मीहि त्यांनां ओळखणे शक्य नाहीं. मी पुष्कळ ठिकाणीं फिरलो आहे. जातां येतां मार्गात अनेक महंत साधु संन्याशांची भेट झाली आहे. त्यामध्येंच कोणीतरी एकजण माझे पितामह जगन्नाथशास्त्री होते, असे जर आपले म्हणणे असेल तर मात्र आपले भविष्य खरे ठरलें म्हणावयाचें ! " युवकाचें हे भाषण ऐकून साधूनें त्याला इंसत हंसत विचारले “ तुझ्या पितामहाच्या शोधासाठींच का तूं या हिमाचलांतून फिरत आहेस ? " " नाहीं महाराज ! " " तर मग तूं कशाला आला आहेस ? " 66

  • माझ्या अपार मनोदुःखांचा उपशम व्हावा म्हणून आत्महत्या करण्यासाठीं

मीं नदींत उडी टाकिली. इतक्यांत एका महापुरुषाने मी अचेतन असतांच मल