ही रामाची अयोध्या ! याप्रमाणें तीन आश्रमांतील आतिथ्य ग्रहण करून तो युवक चवथ्या आश्रमा- पाशीं येऊन पोहोंचला. या आश्रमांतील परमहंसानें कौपिन परिधान केली होती. सर्व शरीरावर त्यानें भस्म चर्चिलें होतें. त्याच्या देहावरची त्वचा हस्तिचर्माप्रमाणे जाड आणि खडबडीत होती, त्याला पाहतांच असें वाटे, कीं, या परमहंसाला ऊष्णशीतादि द्वंद्वांची मुळींच बाधा होत नसावी ! तसे नसतें, तर या ठिकाणी त्याला रहातां आलेच नसतें; कारण, हिमाचलावर अनावृत शरीराने कोणालाहि रहातां येणे शक्य नाहीं! तो परमहंस कोणार्शी एक शब्दहि बोलत नसे. सर्वदा निमीलित नेत्रांनीं तो ब्रह्मचिंतनांत निमन असे. त्याच्या आश्रमांत दुसरा एक साधु रहात असे. त्या साधूनें या तरुणाचा विशेष आदरसत्कार करून त्याला विविध आहार्य वस्तु अर्पण केल्या. युवकाच्या शरीरावरील घोंगडी अगदी जीर्ण होऊन गेली आहे असें पाहून तो साधु आपली घोंगडी त्याला देऊं लागला, परंतु तिचा स्वीकार न करितां युवक त्या साधूच्या मुखाकडे एकसारखा पहात राहिला. कांहीं वेळानें युवकाने त्याला विचारिलें " प्रभो ! आपण कधीं सीतापुरांत होतां काय ? पूर्वी कर्धी तरी मी आपल्याला सीतापुरांत पाहिले आहे, असे मला आठवतें, " साधु किंचित् हास्य करून म्हणाला " बेटा ! मीं संसारत्याग केला आहे, मी कधी कोणाला आत्मपरिचय करून देत नाहीं ! 37 युवकानें पुनः विचारिलें “ आत्मपरिचय करून देण्यांत काय पाप आहे? आपण आत्मगोपन कां करित आहां, मला काही कळत नाही. " "बाबा ! असली ओळख देण्यांत कांहीं पाप नाहीं हें खरें आहे; परंतु संसाराची स्मृति माझ्या हृदयांतून दूर करण्याविषयों मी प्रयत्न करित आहे. आपल्या आयुष्यांतील पूर्वावस्थेच संपूर्ण विस्मरण झाल्याशिवाय कोणालाहि निर्वाणपद- प्राप्तीची आशा नाहीं. " " आपण काय बौद्धधर्मानुयायी आहां ? निर्वाणमुक्तीच्या गोष्टी बोद्धधर्मीय लोकांच्या मुखांतून ऐकू येतात ! " " बेटा ! येथें हिंदु, मुसलमान, बौद्ध सर्व एकच ! येथे सर्व धर्मशास्त्रांविषयीं आह्मांला सारखाच आदर वाटतो. या ठिकाणी कोठल्याहि धर्माच्या किंवा जातीच्या संचधांत मुळींच मतभेद नाही. ""
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१८५
Appearance