ही रामाची अयोध्या ! तेथें हजर असलेच्या दुसऱ्या कंचनी कैलासेश्वरीकडे असूया दृष्टीने पाहूं लागल्या. बादशहाची दृष्टि तिच्यावरच गेली, तेव्हां कैलासेश्वरीसारखी भाग्यवति तीच, अर्से समजून त्या आपल्या दुर्दैवाला मनांत दोष देऊं लागल्या ! बादशहा पुनः कैलापेश्वरीला ह्मणाला "नूनाजान! तुला मी पादशा बेगम करीन, माझें ह्मणणं ऐक, चल ये ! " कैलासेश्वरी दृढतेनें ह्मणाली " कधीं नाहीं ! या देहामधे जीव आहे तोपर्यंत तसं होणार नाहीं ! " बादशहा हे ऐकून किंचित हंसला आणि कैलासेश्वरीला धरण्यासाठी पुढे सरला. • सर्फराजखां बादशहाच्या मागे उभा राहिला. कैलासेश्वरी मागें मार्ग सरू लागली. नासीर विंचित कोपावित्र होऊन सर्फराजखांला ह्मणाला “ घर हिला ! मोठ्या गमजा लावते आहे ! ” कैलासेश्वरी फारच भ्याली. ती मोठ्याने ओरडून ह्मणाली “आह्मी दोघी • राजा दर्शन सिंहाच्या दासी आहो! आमच्यावर बळजबरी झाली तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय कधी राहणार नाहीं !" 'आम्ही दोघी बहिणी राजा दर्शनसिंहाच्या दासी आहों, ' हे कैलासेश्वरांच्या तोंडचे शब्द ऐकतांच बादशहा स्तंभितच झाला! आरक्त लोचनांनीं तो कैलासेश्वरी- कडे टक लावून पाहू लागला. सर्फराजखां दर्शन सिंहाच्या नाशाची ही आयती चालून आलेली संधि वायां जाऊं देणार ? तो झटकन् बादशहाच्या पुढे होऊन हात जोडून ह्मणाला “ मुलके जामानियां ! मी हुजुरांजवळ अगोदरच बोललो होतों, कों, या दोघां कंचनींनां दर्शनसिंहाने आपल्याच नाटकशाळा केल्या आहेत ! यांना येथे येऊन तीन महिने झाले; परंतु या तीन महिन्यांत यांनां हुजुरांपाशी घेऊन यायला त्याला सांध सांपडली नाहीं ! या नूनाजानपेक्षां माना अनेकपटीने सुंदर आहे, असें मी ऐकिलें आहे ! पहा, दर्शनसिंहाचें काय कपट तें ! उत्तम नाटकशाळा तेवढी आपणाकरितां ठेवून, मध्यम नाटकशाळेचा पहिल्यानें उपभोग घेऊन तिला तीन महिन्यांनी त्यानें मुलके जामानियांकडे पाठवून दिली !” सर्फराजखांचे हे भाषण ऐकून बादशहा काही वेळ अगदी स्तव्ध बसून राहिला. एक शब्दहि न बोलतां थोडेच वेळांत तो आपल्या महालांत निघून गेला. सर्फराजखां कृतकृत्य झाला. त्याने मोठ्या आनंदानें कैलासेश्वरीचा मानसन्मान करून तिला -गोमतीतीरावरील बर्गाच्यांत पाठवून दिली. .
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१८१
Appearance