१८० ही रामाची अयोध्या !
- सर्फराजखांची आज्ञा होतांच दुःखाचा आणि शोकाचा उमाळा कसा तरी दाबून
ती गाऊं लागली:- " गगरी मोरी भरन ना दे! घीट लंगरा मधु आजे ! गगरी मोरी भरन ना दे ! जब देखुं तब ठाडो जमुनापे, अब ना राहूं तोरी नगरि; गगरी मोरी भरन ना दे! कैलासेश्वरीचें गायन पुरं होण्यापूर्वीच नासीरने मदिरेचे दोनतीन प्याले झोकून दिले होते! मदिरेनें थोडासा उत्तेजित होऊन तो ह्मणाला " शाबास, शाबास! नूना, शाबास! आजच्या रात्रीच्या गायनाबद्दल तुला एक हजार मोहरा बक्षीस दिल्या आहेत! " नासीरने तिला आणखी एक चीज गावयास हुकूम केला. कैलासेश्वरी पुनः गाऊं लागली :-- सब मिलके मालनीया बंधन बांधोरे! । अरे हाऽऽऽरे ! । मंमदसा प्यारिके घरकाज ! | धृ० । सदा रंगिलि ताननसो बधावो गावो मायीरि सबसाहितसो आये | बंधन बांधोरे ! | अरे हाsssरे ! ॥ १ ॥ बादशाहाने पुनः सुरेचे दोन प्याले फस्त केले ! मदिरेच्या प्रभावानें तो आतां एकदम बेहोष होऊन गेला! कैलासेश्वरीला धरावें म्हणून तो आपल्या जागेवरून उठला; परंतु सुरेचा अंमल अधिक झाल्यामुळे तो दोन पावले गेला नाही तोच झोंक जाऊन समोरच्या एका दासीच्या अंगावर धाडकन् पडला ! ती दासी कैलासेश्वरीच आहे असे समजून तिच्या गळ्यांत हात घालून वादशहा “ मेरी नूना ! मेरी प्यारी नूना ! " असेच एकसारखे मोठमोठ्याने ओरडूं लागला! बादशहाची अशी दुर्दशा पाहून बाकीच्या दासींनी नेहमीप्रमाणे त्याला धरून त्याच्या महालांत नेलें, त्या रात्रीचा नाचरंग याप्रमाणे पुरा झाला! खास दरबारांतील दोस्त आपापल्या ठिकाण निघून गेले. कैलासेश्वरी बाहेर येतांच दर्शनसिंहाचे लोक तिला मेण्यांत • बसवून गोमतीतीरावरील बगीच्यांत घेऊन गेले.