कोळ्यानें पसरलेले अपूर्व जाळें. १७९ कैलासेश्वरी कांही वेळ विचार करून ह्मणाली "पण बादशहाच्या लोकांनी मला जबरदस्तीनं धरून रंगमहालांत नेलं, तर मी काय करूं ?” “ मग दुसरं काय करायचं ? तुझ्या धर्मसंरक्षणाचा उपाय तुझ्याजवळ आहेच! तसा काही प्रकार दिसला तर तत्क्षणी उरांत जंबिया खुपसून आपली सुटका करून घे. " मानकुमारीचें हें भाषण पुरें होतें न होतें तोंच राजा दर्शन सिंहाचे लोक मेणा घेऊन बागेत आले. ह्यातारीनें कैलासेश्वरीला मेण्यांत बसावयास सांगितले. डोळे. पुशित पुशित कैलासेश्वरी मेण्यांत जाऊन बसली. फांशीची शिक्षा झालेला अपराधी ज्या दुःखपूर्ण हृदयानें वधस्थानाकडे जातो, तशाच वेदनापूर्ण हृदयाने कैलासेश्वरी आज बादशहाच्या फरीदबक्ष राजवाड्याकडे चालली होती ! सुमारें एक तासानें मेणा फरीदवक्ष राजवाड्यांत पोहोचला. कैलासेश्वरीला मेण्यांतून उतरवून बादशहाच्या दासींनी एका प्रशस्त महालांत नेले. तेथे त्यांनी तिला विविध मूल्यवान वस्त्रालंकारांनी सजविली. कैलासेश्वरीने त्या वस्त्रभूषणांकडे एकवारहि पाहिले नाहीं! एखाद्या पुतळीप्रमाणे ती निश्चल उभी होती. कांही वेळानें. दुसऱ्या सहा दासींनी कैलासेश्वरीला बादशहाच्या नाचरंगाच्या दिवाणखान्यांत नेलें. नासिरुद्दिन हैदर कैलासेश्वरचे रूप पाहून अत्यन्त मोहित होऊन गेला. आज- पर्यंत अशी दिव्यलावण्यसंपन्न रमणी त्याने कधीहि पाहिली नव्हती. अनिमिष लोचनांनीं नासीर कैलासेवरीच्या मुखाकडे किती वेळ तरी एकसारखा पहात होता, तरी त्याची तृप्ति होईना ! अनूनपर्यंत अश्लील नाचरंगाल आरंभ झाला नव्हता, म्हणून बादशहाच्या खास दवारांतील प्रचलित नियमाप्रमाणे त्याचे इंग्रज दोस्त डोकीवर ' हॅट' (टोप्या) घालून बसले होते; परंतु तितक्यांतल्या तितक्यांत संधि साधून त्यांपैकी एकदोघेजण मधून मधून कैलासेश्वरीच्या मुखाकडे हळूच दृष्टि फेंकित होते! त्या सहा दासींपैकी दोघीजणी- एक बादशहाच्या उजवीकडे आणि एक डावीकडे अशा-उभ्या राहून त्याला वारा घालित होत्या, बाकीच्या चौघीजणी खास दरबारच्या नियमाप्रमाणे वादशहाच्या भोवती बसल्या होत्या! नासीर बसला होता त्या स्थानापासून पांचसहा हातांवर कैलासेश्वरी बसली होती. खास दरबारचा मुख्य मंत्री सर्फराजखां बादशहाच्या जवळच बसला होता. त्याला. बादशहानें खूण करतांच कैलासेश्वरीला गायनास आरंभ करण्यास त्यानें आज्ञा केली. राजवाड्यांत आल्यापासून कैलासेश्वरी दुःखाने अगदीं चूर होऊन गेली होती.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१७८
Appearance