(राठा सम्र हा कोळ्याते पसरलेले अपूर्व जो 697 मे प्रकरण १८ वै. कोळ्यानें पसरलेलें अपूर्व जाळें.
“ I will build you a house of gold and you shall be my Fadsha Begum some day, Nuna. — " — W. Knighton. फरीदबक्ष राजवाड्यापासून सुमारें एक कोस अंतरावर गोमतीनदीच्या तीरावर एका बगीच्यांतील हवेलींत मान्ना, नूना आणि त्यांच्याबरोबर असणारी ती ह्यातारी, हो रहात असत, हें मागें सांगितलेच आहे. या सत्कुलोत्पन्न रमणीद्वयाचा काश्मिरी नायकिणींच्या नांवाने उल्लेख करण्याचें आपणाला आतां कारण नाही. अतःपर आपण मान्नाला मानकुमारी आणि नूनाला कैलासेश्वरी या नांवांनीच ओळखूं. बगीच्याच्या सभोवार कोट होता. बगीच्यांत नानाप्रकारची फुलझाडे व फळझाडे होती. या बगीच्याच्या मध्यभागी एक टुमदार हवेली होती. हवेलीच्या एका खोलीत एका बिछान्यावर मानकुमारी रुग्णावस्थेत पडली होती. कैलासेश्वरी तिच्या जवळ एकसारखी रुदन करित बसली होती. कैलासेश्वरीला रडतांना पाहून मान- कुमारीच्या नेत्रांतूनहिं अविरल अनुप्रवाह सुरू होता. कैलासेश्वरी रडत रडत ह्मणाली “ताई! तुझीमाझी ही शेवटचीच भेट ! आज मी तुझा जन्माचा निरोप घेऊन जाणार! आज संध्याकाळीं तो मेला मला वादशहाच्या दरबारांत घेऊन जाणार, असं मी त्या थेरडजिवळून ऐकलं. " मानकुमारीला बोलाण्यालामुद्धां शक्ति राहिली नव्हती. अश्रुपूर्ण नेत्रांनीं क्षीण स्वरानें ती ह्मणाली " परमेश्वराचं स्मरण कर -" कैलासेश्वरी ह्मणाली “ताई! मला आत्महत्या करायला मुळींसुद्धां भय वाटत नाहीं; पण तुला या अवस्थेत इथं अशी टाकून जायला माझ्या अगदी जिवावर येतं! ताई, तुला मी एकटी कशी टाकून जाऊं? शेवटीं तुझ्या तोंडांत एक थेंब तरी पाणी घालील असं इथं कोणीसुद्रां नाहीं ! " दोघीजणीहि पुनः स्फुंदरफुंदून रुदन करूं लागल्या. कांही वेळानें कैलासेश्वरी ह्मणाली 'ताई ! या सान्या जगांत माझं असं ह्मणायला कुणी नाहीं, असं मला पूर्वी 66 मुख्य वेगम होशील ! 66 'नूना ! तुझ्यासाठी मी सुवर्णमंदिर निर्माण करीन आणि एक दिवस तूं माझी - डब्ल्यू. नाइट. -