Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! पहांटे तीन वाजायाच्या सुमारास छावर्णाजवळ मोठी गडबड झाली. ही गडबड आणि आरडाओरड कां होत आहे, हें कोणालाच समजेना ! राजा दर्शनसिंह आपल्या शिवायांसह बादशहाच्या तंबूकडे जातांना दिसला. पहातां पहातां दर्शन- सिंहाचे शिपाई बंदुकांचें बार काढून गोळ्यांचा वर्षाव करूं लागले. त्यावेळीं चोहोंकडे दाट काळोख होता. कोण कोणावर बंदुक झाडतो आहे, हें बादशहाच्या इंग्रज दोस्तांस कळेना. जिकडे तिकडे एकच गोंधळ उडाला ! परंतु लवकरच सगळ्यांनां समजून आलें कीं, बेगमांच्या तंबूत चोर शिरले आहेत. कांहींजणींचीं जाकें कापून त्यांच्या नाकांतील दागिने चोरांनीं पळविले. कांहीं जणींचे कान तोडून क्यांच्या कानांतील अलंकार त्यांनी हिसकावून नेले. बादशहाच्या कित्येक दासी ताही स्त्रिया यांनांहि चोरांनी पळवून नेलें ! बादशहानें ताबडतोच मेणे आणि हत्ती तयार करून आणावयास हुकूम केला. हत्ती आणि मेणे न्येऊन दाखल होतांच बरोबरचें सामानसुमान तसेच टाकून उरलेल्या सर्व स्त्रियांस बरोबर घेऊन बादशहा ताबडतोब लखनौकडे निघून गेला | राजा दर्शनसिंह, हकीम मेहंदी अलीखां, नायव दिवाण राजा मेवारामसिंह आणि नबाबाचे इंग्रज दोस्त सकाळ होईपर्यंत तेथेंच होते. सकाळ होतांच बेगमांच्या तंबूंत मूल्यवाम सामान चोहोकडे अस्ताव्यस्त पसरले आहे असे त्यांना दिसून आलें. -सकाळ मेहेंदी अल्लीखानें चोरांनां पकडून आणण्याबद्दल हुकूम फर्माविला. सेवापती राजा दर्शनसिंह, यानें चोरांच्या शोधासाठीं चोहोकडे आपल्या हाताखालचे लोक पाठविले. रात्रीच्या रात्रींच चोरांनी पोबारा केला होता. त्यांचा पत्ता गणे कठीण होते; परंतु खरे चोर सांपडले नाहीत ह्मणून दर्शनसिंहाचे लोक योडेच निराश होणार होते! जवळपासच्या गांवांतले लोक पकडून त्यांनी लखनौला पाठवून दिले. सहा महिनेपर्यंत जे रोगी लोक अंथरूणाला खिळून राहिले होते, तेच पहिल्या प्रथम पकडले गेले. “यांनां पकडतांना जी मारपीट करावी लागली ज्यामुळेच हे असे अर्धमले झाले आहेत; यांनींच काल रात्रीं दरोडा घातला, ' असे दर्शनसिंहानें आणि मेहेन्दी अल्लीखांनें बादशहाला सांगितलें, बादशहानें सर्वांनां ताबडतोब फांशीची शिक्षा दिली. बिचारे पन्नासपाऊणशे निर्दोष लोक यादशहाच्या या हुकुमानें नाहक मारले गेले ! " याप्रमाणे शिकार आटोपली. पुन: बादशहाला करमणुकीची वाण भासूं लागली. त्याचें चित कशावरहि लागेना. पुन: खास दरबारांतील बादशहाच्या दोस्तांनां चिंता पडली ! बादशाकरितां दुसरी एखादी करमणूक ते शोधून काढणार, तो सव्हर्नर जनरल लार्ड बुइल्यम बेंटिक लखनौंत येऊन दाखल झाला.