ही रामाची अयोध्या ! असत. सर्व बेगमांच्या महालांतील एकंदर स्त्री-सैनिक ऐके ठिकाणी जमून बाद- शहाच्या हुकुमानें गाजीउद्दीन हैदरची बडी बेगम जनाबे आलि हिच्या महाला- वर चाल करून गेले. परंतु जनाब आलि बेगमच्या महालांतहि सुमारे दीडशे स्त्री-सैनिक होत. मागील प्रकरणांत जिचा उल्लेख आला आहे ती बुंदियेची मुलगी गंगा जनाबे आलीच्या महालांतील स्त्री-सनिकांवर कॅप्टन होती. नासीरने पाठविलले स्त्री-सैन्य जनाबे आलि बेगमेच्या महालावर हल्ला करण्यास येत आहे ही बातमी समजतांच जनाबे आलीचे स्त्री-सैनिकहि त्यांच्यांशी दोन हात कर.वयाला शस्त्रास्त्रांसह सिद्ध झाले. बंदुका, तरवारी, ब्यागनेटे हातांत घेऊन तेहि शत्रुसैन्यावर तुटून पडले दोन्ही पक्षांची लढाई जुंपली. दोन्ही सैन्यांतून बदुकांच्या गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. जनाबे आलं.च्या सैन्यांतील तीन शिपाई जखमी झाले, परंतु नासारच्या पक्षाकडील दहाबारा सैनिक ताबडतोब ठार झाले ! दोन्ही पक्षांत भयंकर रण माजून राहिले. वजीर मेहेंदी अल्लाने या संग्रामाची बातमी ताबडतोब इंग्लिश रसिडेंटकडे पाठविली. तत्क्षणी रेसिडेट घोडा दांडित रणभूमीवर येऊन दाखल झाला व त्याने नासीरला दोन गोष्टी समजावून सांगून युद्धापासून परावृत्त केले. रेसिडेंटच्या हुकुमाने उभयपक्षांतील योद्धे निघून गेले. नासरचा इट हेतु सिद्धीस गेला नाही. वर वर्णन केलेल्या युद्धामुळेच दर्शनसिंहाचा वचाव झाला. ज्या दिवशी मात्रा आणि नूना यांनां दरबारांत आणण्याचे त्याने बादशह जवळ कबूल केले होतें, त्या दिवशी दुपारीच हैं युद्ध झाले. लढाईच्या गडबडीत नासिरुद्दिनला काश्मिरी कंचनीचा विसर पडला. बादशहाचे हे विस्मरण दर्शनसिंहाच्या आयतेंच पथ्यावर पडलें ! जनावे आलि बेग्मेपासून मना जानला दूर करण्याची सर्व खटपट व्यर्थ गेल्यामुळे बादशहा कांही दिवसपर्यंत अगदी उदासीन आणि विरक्त होऊन गेला होता. कोठल्याहि गोष्टीवर त्याचे मन लागेना. बादशहाचे दिलजान दोस्त पंचायतन त्याचे चित्त प्रफुल्ल ठेवण्यासाठी अनेक उपाय शोधून काढी, परंतु त्यांनां यश येईना. बादशहाच्या खास दरबारांतील सभासदांनां • आतां पुढे काय करावें द्दा मोठा प्रश्न पडला. शेवटी, पुष्कळ विचार व भवति न भवत होऊन सर्वानुमते असे ठरलें कीं, लखनौंपासून थोड्या अंतरावरच्या अरण्यांत शिकारीकरतां जाण्याविषयीं
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१६७
Appearance