Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! माना आणि नूना यांचा झलानखान्यांत प्रथम नाटकशाळेच्या रूपाने प्रवेश करून द्यावा, असे त्यानें ठरविलें. याप्रमाणे त्यांचा एकदा नाटकशाळा ह्मणून झनानखान्यांत प्रवेश झाला ह्मणजे त्यांच्या अप्रतिम लावण्याच्या जोरावर त्या लौकरच बादशहाच्या बेगमपदावर आरूढ होतील, अशी दर्शनसिंहाची पक्की खात्री होती. त्याला पक्के माहीत होतं कीं, 'मुताही स्त्रियांपेक्षां नाटकशाळांना बादशहाच्या वेगमपदाचा लाभ होणें अधिक सुलभ आहे ! पुष्कळ 'मुताही' स्त्रियांनां बादशह चे कर्धी दर्शनसुध्दां घडत नाही. मान्ना आणि नूना यांचा नाटकशाळा ह्मणून जर बादशहाच्या अंतःपुरात प्रवेश होईल, तर भाग्यक्रमानें त्या लवकरच बेगमा झाल्याशिवाय रहाणार नाहीत, असे दर्शनसिंहाला खात्रीपूर्वक वाटत होते. 93 राजा दर्शनसिंहाने जरी याप्रमाणे मान्ना आणि नूना यांनां बादशहाच्या झनान्यांत नाटकशाळा म्हणून पाठविण्याचे ठरविले होतें, तरी अद्यापि त्याला तसे करण्यास योग्य संधि सांपडली नाहीं ! मानाच्या आजारपणामुळे तर आतां तो मोठ्या संक्रांत पडला होता. या प्रसंगी काय केले असतां वादशहाची आपल्यावर खप्पा मर्जी होणार नाहीं, हैं त्याला समजेना. चार दिवसांच्या आंत काश्मिरी कंचनीनां दरबारांत घेऊन येतो असे त्यानें बादशहाजवळ कबूल केलें होतें. चार दिवसांपैकी तीन दिवस् तर निघून गेले ! दर्शनसिंह अयंत चिंताकुल झाला ! परंतु एककच्या नशीबाचा जोर किती दिलक्षण असतो पहा ! मनुष्य संक्टांत सांपडला असतां कधीं कधीं आकस्मिक एखादी विलक्षण गोष्ट घडून येऊन त्याच्यावरचे संकट टळतें ! आज लखनौ शहरांत जर पुढील विलक्षण गोट घडून आली नसती, तर नासीरच्या कोपानलांत दर्शनसिंह भस्म होऊन गेला असता! मृत कुदसिया बेगमेच्या विनंतीवरून नासिरुद्दिननें मना जान नांवाच्या एका मुलाला आपला पुत्र ह्मणून कबूल केले होते; परंतु कुदसिया बेगमेच्या मृत्युनंतर तिला दिलेले वचन विसरून बादशहा मना जानचा पुत्र ह्मणून स्वीकार करण्यास नाकबूल झाला. याच सुमारास गव्हर्नर जनरल लॉर्ड वुइल्यम बेंटिक लखनौला येणार होता. मना जानला आपला पुत्र म्हणून जर गव्हर्नर जनरलच्या पुढे या प्रसंगी उभा केला, तर आपल्यामागें मना जानलाच अयोध्येची गादी मिळेल, असा विचार नासिरुद्दिनच्या मनांत आला; ह्मणून मना जानला या वेळीं लखनौहून दुसरी कडे कोठें तरी पाठविला पाहिजे, किंवा तें नच साधल्यास त्याचा प्राणनाशहि • केला पाहिजे, असा बादशहानें निश्चय केला.