१६४ ही रामाची अयोध्या ! रहातात. कांहींकांहीं महालांतल्या 'मूताहि' स्त्रियांनां बादशहानें असूनपर्यंत पाहिलें देखील नाहीं ! ” 'मुताही ' स्त्री ह्मणजे काय प्रकार आहे, याबद्दल वाचक बरेच विस्मयांत पडले असतील. याठिकाणीं बादशहाच्या झनानखान्याची रचना व त्यांतील मुख्यमुख्य नियम वाचकांना समजावून देणे आवश्यक आहे. दिल्लीच्या बादशहाची कन्या ही नासिरुद्दिन हैदरची मुख्य बेगम होती. लग्नानंतर ती 'ताजमहाल ' या नांवाने सर्वत्र परिचित आहे. तिचा महाल अगदीं स्वतंत्र वेगळा होता. तिच्या महालांत असंख्य दासदासी आणि कमीतकमी पन्नास स्त्री शिपाई होते. नासीरचें तिच्यावर प्रेम नव्हते, तरी सर्वत्र तिचा मान व आदर मोठा होता. तित्री पदमर्यादा सर्वजण मानित असत. ती सर्वोत श्रेष्ट बेगम होती, यात्रिषयों कोणी कधीहि वाद केला नाही. दुसऱ्या कोणत्याहि बेगमेवर नासीरचें जरी अत्यंत प्रेम असले, किंवा दुसरी कोणतीहि बेगम जरी नासीरच्या हृदयावर ताबा चालवित असली, तरी तिला ताजमहाल बेगमेबरोबर एका आसनावर किंवा समान आसनावर बसतां येणे शक्य नव्हते. इतर सर्व बेगमांनां ताजमहाल बेगमेला मनांत नसले तरी मान द्यावा लागत असे; परंतु जरी ताजमहाल बेगमेचा चोहीकडे मोठा मान होता, जरी तिचा अधिकार मोठा होता, तरी ती पतिप्रेमाला सर्वथा वंचित झाली होती. नासीर बहुधा तिचें कधीं दर्शनहि घेत नसे. ताजमहाल वेगम जरी पतित्रसाला व पतिमुखाला सर्वस्वी वंचित झाली होती तरी तिचें उच्चपद, श्रेष्ठ अधिकार, उच्च वंशसंभवाबद्दलचा तिचा सदभिमान व सद्गुणांकडे तिचा नैसर्गिक ओढा, यामुळे ती कधींसापासून कैसभरहिं ढळली नाही. विदेशीय लोकांची अशी कल्पना असते की, पतिसुखाला किंवा पतिप्रेमाला वंचित झालेल्या बेगमा बहुधा कुपथगामिनी होतात. परंतु या भारतवतील हिंदु आणि मुसलमान स्त्रियांच्या चरित्राची रचना फार उच्च दर्जाची आणि निराळ्याच प्रकारची आहे. अयोध्येच्या या साध्वी ताजमहाल बेगमेनें आपली पदमर्यादा सोडून पवित्र नारीधर्माचे विसर्जन केल्याचा कोणत्याहि इतिहासकारानें कोठेंहि यत्किंचितहि उल्लेख केलेला नाहीं. कांहीं हीनकुरोद्भव स्त्रियांनांहि नासीरने आपल्या बेगमपदावर आरूढ केले होते. त्यांच्याबद्दल निरनिराळ्या तऱ्हेच्या अनेक कंडया उठत असत. नासीरच्या 'मुताही'
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१६३
Appearance