विषय केवळ दुःखमूलच ! राजा दर्शनसिंहाला फार आशा होती. सर्फराजखां खास दरबारांत जरी प्रधान पदावर विराजमान झाला होता, तरी वस्तरा कांहीं त्याच्या हातून सुटला नव्हता. अझूनहि सर्फराजखां दररोज बादशहाची केशरचना करित असे. बादशहाच वस्तरा आणि ब्रश अझूनपर्यंत त्याच्याच हातांत होता. सर्फराजखांला पदच्युत केल्यावर आपण त्याच्या जागी दुसरा एक विलायती न्हावी आणूं, असा दर्शन- सिंहाने आपल्या मनांत पक्का निश्चय करून ठेविला होता. सर्कराजवांप्रमाणे दर्शन- सिंहाला वस्तरा हातांत वागविणे शक्य नव्हते, ह्मणून तर तो विलायतेहून दुसरा हजाम आणविणार होता! परंतु मात्राच्या आजरीपणाने दर्शनसिंहाने बांधलेल्या ह्या मनोरथली इमारतीचे मजले घडावड कोसळू लागले ! त्याच्या सर्व कल्पना आणि आशा विफल होण्याचा रंग दिसूं लागला ! दररोज सायंकाळी गोमतीतीरावरील त्या बागेत जाऊन दर्शनसिंह ह्यातारीशीं गुप्त खलबतें करित बसे, मान्नाला लवकर आरोग्य प्राप्त व्हावें ह्मगून म्हातारी रात्रंदिवस रामनामाचा जन करित होती! पशुपक्ष्यांची युद्धे समाप्त झाल्यावर नासीरच्या मनोरंजनार्थ दुसरी कांहीं करमणूक निधैना, तेव्हां काश्मिरी कंचनी आणण्याबद्दल त्यानें दर्शनसिंहाला हुकूम केला. बादशहाला या वेळी काय सबब सांगावी, याबद्दल दर्शनसिंहाला जरा विचार पडला; परंतु धीर करून तो ह्मणाला " मुलके जामानिया ! मान्ना आणि नूना नांत्राच्या दोन प्रसिद्ध कश्मिरी कंचनी पंजाबहून नुकत्याच येथे येऊन पोहोंचल्या आहेत, परंतु उन्हाळ्याच्या भयंकर तापानें मान्ना आजारी पडली आहे. ह्मणून निदान चारपांच दिवस तरी तिला दरबारांत मुजरा करायला येणे शक्य नाहीं, या कपुरीबद्दल हुजुरांनी माफी करावी. " बादशहाला याप्रमाणे सबब सांगून तेवढी वेळ मारून नेल्यावर सायंकाळी दर्शनसिंह बगीच्यांत ह्यातारीकडे आला. दरबारांत घडलेली हकीगत त्याने तिला सांगितली व " पुढे काय करावें?” असा प्रश्न केला. वृद्धा ह्मणाली “काय करावं! मान्नाचं दुखणं तर दिवसेंदिवस सारखं वाढत आहे, दुखण्याचं पाऊल मागं नाहीं. या दुखण्यांतून ती ह्मणजे उठेळ, अशी मला कांहीं आशा दिसत नाहीं. आतां एकट्या नूनालाच बादशहाच्या झनान्यांत पाठवून दे दुसरा कांहीं इलाज नाहीं!" दर्शनसिंह ह्मणाला नूनाला तरी ' मुताही ' म्हणून बादशहाकडे पाठवून आपला कांही फायदा होईल असे मला वाटत नाही. हल्ली बादशहाच्या झनान्यांत ' मुताही ' स्त्रियांची संख्या जवळजवळ तीनशे आहे. त्या निरनिराळ्या महालांत मग ८८
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१६२
Appearance