ही रामाची अयोध्या | लागत असत. बादशहाच्या मनोरंजनाकरितां दरबारच्या लोकांनां नित्य नवे नवे प्रकार शोधून काढावे लागत. पक्ष्यांच्या लढायांनी नासीरचें बरेंच मनोरंजन झाले होते या करमणुकीनें तो फार संतुष्ट झाला. पशुपक्ष्यांच्या युद्धाचे काम सर्फराजखांवर सोपविण्यांत आले होतें व तें त्यानें उत्तम प्रकाराने पार पाडले होते; यामुळे सर्फराजखांवर बादशहाची बहाल मर्जी होऊन तो त्याची फार प्रशंसा करूं लागला; परंतु बादशहाच्या मुखांतून सर्फराजखांची प्रशंसा ऐकून राजा दर्शनसिंहाला अत्यंत विषाद वाटूं लागला. त्या स्तुतचे प्रत्येक अक्षर दर्शनसिंहाच्या हृदयाला सर्पदंशाप्रमाणे व्यथा करूं लागले, दर्शनसिंहावर बादशहानें जी कामगिरी सोपविली होती, ती त्यांच्याकडून अद्यापपर्यन्त बज वली गेली नव्हती. मान्ना आणि नूना लखनौला पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मात्रा भयंकर रीतीनें आजारी पडली. तिच्यानें बिछान्यावरूनहि उठवेना. फरीदबक्ष राजवाड्यापासून सुमारे एक कोस अंतरावर गोमती नदीच्या दुसऱ्या तीरावरील एका बगीच्यांत मान्ना आणि नूना त्या वृद्ध स्त्रीसह रहात असत. दर्शनसिंहाने नेमलेले पहारेवाले बागेसभोवती सर्वकाल जागरूकतेने पहारा करीत. मान्नाच्या आजारीपणामुळे दर्शनसिंहाला घोर चिंता लागून राहिले. काश्मिरी कंचनी आणण्याच्या खर्चासाठी बादशहाकडून त्याने एक लक्ष रुपये घेतले होते. माना आणि नूना यांपैकी कोणीहि काश्मिरी कंचनी नव्हती. दर्शन सिंह ने त्यांची नांवें मात्र काश्मिरी कंचनीचीं ठेविली होती, व काश्मिरी नहीं की ह्मणून त्यांना त्यानें कानपुराहून लखनौला आणिलें होतें. त्याच्या या सर्व व्यूहाची लवमात्र जरी परिस्फुटता झाली असती, तर दर्शनसिंहाला पदच्युत व्हावे लागून कडक शिक्षा भोगावी लागली असती. बादशहाला आपण काश्मिरी कंचनी नजर केल्यावर आपण त्याचे प्रियपात्र होऊं, अशी त्याने मनांत मोठी आशा बाळगिली होती, आणि या आशेच्या पायावर त्याने मनोरथरूपी एक टोलेजंग इमारत उठविली होती. हकीम मेहेंदिखांच्या जागेवर आपली वजीर हणून नेमणूक होईल, ही इच्छा त्या इमारतीचा कळस होऊन राहिली होती. हकीम मेहेंदिखां जरी वजीर असला, तरी बादशहाच्या खास दरवारांत कांहीं त्याला स्थान नव्हतें. आपणाला मुख्य वजिराची जागा मिळाल्यावर आपण दोहींकडे काम करूं; मुख्य वजीर ह्मणून राज्यशकट हांकूं व बादशहाच्या खास दरबारांत सर्फराजखांच्या पदावर विराजमान होऊं, अशी
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१६१
Appearance