१६० ही रामाची अयोध्या ! ' बुडिया ' कधीहि हरणार नाहीं, हे इंग्रजी शिक्षकास अगदी पके माहीत होतें; परंतु बादशहाशी पैज मारावयाची झणजे बादशहा ती जिंकेल अशचि मारिली पाहिजे ! नासीर ह्मणाला " या लढाईत 'तराईवाला' हरेल. 'तराईवाला ' • पराजित झाला नाही तर मीहि पांचशे असरफी हरेन. " शेवटी, युध्दांत 'तराईवाला' हरला. बादशहाला पैज जिंकल्याबद्दल मोठा अभिमान वाटू लागला. शिक्षकाकडे जयदर्शक मुद्रेने पाहून तो पांचशें असरफाची मागणी करूं लागला. आपण पैज हरलो असे कबूल करून शिक्षकहि बादशहाला पांचशे असरफी देण्यास तयार झाला. वाघांची लढाई संपल्यावर हत्तींच्या युध्दास प्रारंभ झाला. बादशहाच्या पील- खान्यांत ' मालियार ' नांवाचा एक प्रचंड हत्ती होता. आजपर्यंत नवीन नवीन हत्तींशी लढाया मारून 'मालियार'नें कमीत कमी शंभर वेळ तरी जय मिळविला असेल यध्द करता करतां एकदा त्याचा एक दांतहि मोडला होता. आज दुसऱ्या एका प्रचंड हत्तीशी 'मालियार'ची लढाई लागली. दोघांहि हत्तींचे माहुत आपापल्या हत्तीनां पुढे वरून लढण्याबद्दल उत्तेजन देत होते. ज्याचा हत्ती जिंकेल त्या माहुताला मोठे इनाम मिळणार होते, ह्मणून आपल्या हत्तीने लढाई जिंकण्याबद्दल दोघेह माहुत परकाष्ठेचे श्रम करित होते. थोड्याच वेळांत मलियार'चा प्रतिद्वंद्वी हत्ती पराजित होऊन पळून जाऊं लागला. 'मालियार' हि एखाद्या धीर- प्रकृति वीराप्रमाणे पळणाऱ्या शत्रूला दया दाखवून युध्दापासून विरत झाला; परंतु गच्चीवरून वादशहानें हुकूम केला "मलियारला पुनः मरत करा ! ” साहेबहि ओरडले " या वेळी मालियारला 'मास्ट' केलाच पाहिजे ! " • हत्तीचा माहुत बक्षिसाच्या आशेनें ललचादून, पराभूत झालेल्या हत्तीच्या मागे ' म'लियार' ने ईपने धावत जावें हणून अंकुशाने त्याला वारंवार टोचूं लागला. • मलियार'ला ते सहन झाले नाही. एका क्षणांत त्याने सोडेने माहुताला खाली पाडून आपल्या पायांखाली चिरडून टाकले. माहुत तत्क्षणी ठार झाला! 'मालियार' मृत माहुताचा एक एक हात जोराने उपटून काढून लीलेने अंतरिक्षांत उडवू लागला. मृत माहुताची स्त्री आपत्या लहान मुलाला कडेवर घेऊन जवळच उभी होती. नवरा मेलेला पाहून ती मुलाला उराशी धरून हत्तीकडे धावत जाऊं लागली. हा प्रकार गच्चीवर बसलेल्या रेसिडेंटाच्या नजरेस येतांच समोर असलेल्या
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१५९
Appearance