Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषय केवळ दुःखमूलच ! प्रकरण १६ वं. विषय केवळ दुःखमूलच ! Then I looked on all the works that my hands had wrought and the labour that I had laboured to do ; and, behold, all was vanity and vexation of spirits, and there was no profit under the Sun. -- Ecelesiastes Chapter 11-11. श्रावण महिना बहुतेक संपत आला होता. भाद्रपदाच्या प्रारंभीच गव्हर्नर जनरल वुइल्यम बेंटिक लखनौला येणार होता. त्यानिमित्त जिकडून तिकडून लोकांचे थवेच्या थवे राजधानीत जमूं लागले. दिवसेंदिवस त्या लोकारण्याचा विस्तार झपाट्याने वाहू लागला. बादशहाचा दिलजान दोस्त सरफराजखां याने अजब- खान्यांत निरनिराळ्या पशुपक्ष्यांची भरती करून अगदी उत्तम तयारी करून ठेवली होती. पशुपक्ष्यांची युद्धे, कंचनीनर्तकींची नाचगाणीं, यांतच नासिरुद्दिन हैदर •मोठ्या ख्यालीखुशालीन दिवस काढित होता. वरून पहाणाराला तो मोठा सुखी आहे असे वाटत असे, परंतु खरोखर पाहिले तर त्याला कशापासूनहि स्थायी सुख किंवा चिर शांति मिळत नव्हती. गोमती नदीच्या तीरी, घाटासमोर एक सुरम्य उंच जागा तयार करण्यांत आली होती. गव्हर्नर जनरल, रेसिडेंट, खुद्द बादशहा, बादशहाचें दिलजान दोस्त- पंचायतन वगैरे खास मंडळी याच जागी बसून निरनिराळ्या पसूची युद्धे पहाणार होती. याच जागेच्या समोर परांच्या युद्धासाठी प्रशस्त रंगभूमि मुद्दाम तयार करण्यांत आली होती. बादशहाच्या अजबखान्यांत या वेळीं दीडशें हत्ती, चार सिंह, चौदा बाघ, दहा गेंडे, तीस रानरेडे, सात उंट, दहा आस्वले आणि इतर निरनिराळे पशु होते.

  • माझ्या हातून जीं जीं कर्मे घडली होतीं- आजपर्यन्त जे जे श्रम मी केले होते,

त्यांचें मीं सिंहावलोकन केलें, तो काय आश्चर्य ! जिकडे तिकडे निःसारता आणि मनःक्षोभ यांशिवाय मला कांहीं दिसून आलें नाहीं. सर्व भूतलावर खरा लाभ कोटेहि आढळला नाहीं. - इकलिसिआस्टिस भाग २-२.