१५४ ही रामाची अयोध्या ! त्या मेलीजवळ कद्रींकद्रीं राहिल्यै नसत्यें ! पग पुढं दर्शनसिंहाचा बाप दुखण्यानं पडला, अन् त्यामुळे सातेचं लताहे झालं नाही. दर्शनसिंहानं जयपालसिंहाला इथून नेलं तेव्हां ते शुद्रीवर नव्हते. जातांना त्या अवदसेला दर्शनसिंहानं सीतेला नाचायलागायला शिकवायला सांगितलं होतं. त्याप्रमाणं ती सांतेला शिकवू लागली. ज्या मुलीला वेड लागलं होतं तिला नाचायला शिकण्याविषयीं तो आग्रह करूं लागली कीं, ती पोरगी तिला शिव्या देऊन धुडकावून लावित असे. " " तर मग तुझी सीता बादशहाच्या रंगमहालांत जायला कबूल झाली ? " " नाही नाहीं ! सीता लहान होती तेव्हां 'तुला बादशहाकडे पाठवायची ' असं ती बाई तिला म्हणत असे. तेव्हां बरंवाईट तिला काही कळत नसे सिता मोठं, झाल्यावर सर्व गोष्टी मी तिला नीट समजावून सांगितल्या. माझी सीता मोठी गुणांची पोर होती. महाराज, मी सांगितलेल्या गोटो तुम्ही कुणाला सांगू नका हो ! तुमच्या एकट्याजवळच नीं त्या सांगितल्या आहेत. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पण दर्शनसिंहाला तुम्ही कांहीं सांगणार नाही ना ? "" " नाहीं, मी कुणाजवळ काही बोलणार नाहीं. तुला काय सांगायचे ते माझ्या- जवळ निर्भयपणे सांग, मुळींच भिऊं नकोस तुझ्या सीतेला परत तुला आणून देण्याचा मी होईल तितका प्रयत्न करीन. " "स्वातीजी ! तुम्ही माझ्या सीतेला परत आणून द्याल ? तर मग मी तुझाला दहा रुपये देईन. तुम्ही वर चला. तुम्हाला मी ती सगळी हकगित सांगत्ये तुम्ही लखनौला जल का ? तर मग आपल्याबरोबर माझ्या गंगालाहि घेऊन या.” असें म्हणून ती स्त्री अयोध्यानाथाला आपल्याबरोबर माडीवर घेऊन गेली. ही स्त्री कोण, हे वाचकांनां सांगण्याचे कारण नाहीं. मागच्या एका प्रकरणांत सांगितलेली दर्शनसिंहाच्या घरची बुंदिया दाई ती हीच, हे वाचकांच्या अगोदरच लक्ष्यांत आले असेल. बुंदिया अयोध्यानाथाला बरोबर घेऊन माडीवरच्या दिवाणखान्यांत गेली. बुंदियेला कुठेहि आपपर भाव नव्हता सगळ्यांनां ती आपलेच असे समजत असे. मागच्या एका प्रकरणांत उल्लेख केलेल्या ह्यातारीशिवाय ती सर्व पृथ्वीत कोणालाहि शत्रु समजत नसे. सगळ्यांजवळ ती आपल्या मनांतील गोष्टी सांगे. परंतु तिची मुलगी गंगा हिला दर्शनसिंहानें फुसलावून लखनौला नेल्यापासून ती त्यालहि आपला परम शत्रु समजत असे आणि त्याला फार भीत असे. या दोघां
- शिवाय सर्व पृथ्वी तिला मित्राप्रमाणे वाटे.