Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दैवबळ. १५३ तिची फक्त मरणाचीच इच्छा होती. काही दिवसांनीं तिला वेड लागल्यासारखं झोलं. भ्रमांत ती 'बाबा, दादा, ताई, प्राणेश्वर, अयोध्यानाथ इतकंच मोठमोठ्यानं ओरडत अने. माझ्या सीतेवर मात्र पहिल्यापासून तिचं फार प्रेम असे. सिता जवळ गेली ह्मणजे ती तिचं तोड कुरवाळी अन् ' हेच माझे अयोध्यानाथ - माझे प्राणेश्वर' असं ह्मणे. एक वर्षापर्यंत ती अशी आजारी होती. एकदा तर ती जगते का मरते अशी स्थिति झाली होती. माझी सीता तिच्या- जवळ नेहमी बसुन राही तिचा गळा सुकला ह्मगजे तिच्या तोंडांत दुध घाली. तीन चार महिने झाले, ती मुलगी थोडीशी बरी झाली आहे. त्या मुलीलाहि ते चांडाळ लखनौला घेऊन गेले आहेत. " त्या स्त्रीने सांगितलेली ही, हृदयद्रावक हकीगत ऐकून अयोध्यानाथाच्या अंगावर शहारे आले. त्याच्या मनांत शंका आली की, बहुवा दर्शनसिंहाच्या लोकांनी मानकुमारीलाहि याच घरांत आणून ठेवली असेल. आपला हा तर्क कितपत ख आहे. हे पहावें हृणून त्याने विचारले “त्या मुर्लाला दर्शनसिंहाने कोणत्या देशाहून आणले होते ? ” S 32 • कुणीकडून त्यानं तिला आणली, ते मला कळलं नाही. ' (: तिने कधी तुला आपल्या बापाचे किंवा नवयाचें नांव सांगितले नाहीं ? ” "नाही कधीहि सांगितलं नाहीं. अन् ती बोलणार तरी कवी ? आणल्यापासून थोड्याच दिवसांत तिचं डोकं फिरलं-नंतर पुढं ती भयकर आजारी पडली. आणि जेव्हां ती थोडीशी बरी झाली तेव्हांपासून रात्रंदिवस सरखं रडूनरडून आपलं लुगडं ओलं चिंब करून शकित असे. YO " " राजा दर्शनसिंहाच्या लोकांनी तिला इथेच आणून ठेवले होते काय ?” “ होय महाराज तिला इथंच आणून ठेवली होती. अन् या सगळ्या अनर्थाचं कारण कोण म्हणाल तर ती अवदसा! मी आपणाला मघाशी सांगितलंच आहे कीं, ती पूर्वी नर्तकी कंचनी होती. दर्शनसिंहाच्या बापानं म्हातारपणी तिला आपल्या पदरी ठेवलं. दर्शनसिंह सुंदरसुंदर मुली लांबलांबून पळवून अ.णून इथं ठेवित असे अन् त्यांनां गाणंनाचणं शिकवायचं काम हिला सांगत असे. " 66 तुझ्या सीतेलासुद्धां तिनें गायलानाचायला शिकवले होने का ? " " माझी सीता नऊ वर्षांची झाल्यावर दर्शनसिंहाच्या बापानं तिच्या लग्नाचं निश्चित केलं. सीतेचं लग्न झालं असतं तर मीहि तिच्याबरोबर निघून गेल्यें असत्यें.