१५० ही रामाची अयोध्या ! बादशहाच्या रंगमहालांत तिला पाठवावयाला कोण घेऊन गेली ? ही स्त्री कोण ? ती 'अवदसा' कोण ? इत्यादि अनेक प्रश्न त्याच्या मनांत उभे राहिले. परंतु मनांतले विचार गुप्त राखून त्या स्त्रीजवळ जाऊन त्याने विचारले “जयपालसिंहाची ही बाग काय ? जयपालसिंह येथें आहेत का ? " ती स्त्री खालों मान घालून सारखी रडत होती. अयोध्यानाथाचा तो प्रश्न ऐकून विरक्तभावाने ती ह्मणाली "होय, जयपालसिंहांचीच ही बाग. ते इथं असते, तर माझ्या सीतेला लखनौला पाठवायला कुणाला धीर झाला असता !” असे ह्मणून ती मोठ्यानें रहूं लागली. त्या स्त्रीचें हें भाषण ऐकून व तिची चयी वगैरे पाहून अयोध्यानाथाला अधिकाविकच शंका यऊं लागल्या. त्याने विचारले "जयपालसिंह मृत्यु पावले काय ?” ती स्त्री कांही उत्तर देणार, तो माळी मध्येच झगाला "नाहीं. ते अद्यापि जिवंत आहेत. आजारी पडल्यामुळे ते इथून गेले आहेत. आपण इथे कुणाला शोधित आहां ? अयोध्यानाथानें विचारलें " जयपालसिंहानें जी एक मुलगी बाळगिली होती, ती हह्रीं कुठे आहे ? " अयोध्यानाथाचा हा प्रश्न ऐकून ती स्त्रो त्याच्याकडे बारकाईने पाहू लागली. अजूनपर्यंत तिने अयोध्यानाथाकडे एकदामुद्रां पाहिले नव्हते. अयोध्यानाथाची भगवीं वस्त्रे पाहून तिनें विचारले " महाराज, आपणाला भविष्य बघतां येतं का ? त्या दिवशीं इथं एक जेःशी आला होता, त्यानं माझी सीता खास परत येईल- त्या अवदसेजवळ ती रहायची नाही, असं मला सांगितलं. त्याला मी चार पैसे दिले आपणाला मी दोन आणें देत्यें-- " तिचें हें भाषण ऐकतांत्र अयोध्यानाथानें एक दीर्ध निश्वास टाकला. आपल्या सर्व आशा खास विफल झाल्या, असेंच त्याला वाटलें. आपली भागनी कैलासेश्वरी हिला कोणीतरी लखनौला नेऊन ठेविली असावी, असा त्यानें तर्क केला. संकटकालीं अयोध्यानाथाला दुप्पट धैर्य चढत असे. मनांतला भाव गुप्त ठेवून त्याने विचारलें तुझी सीता कोण ? तिचें काय झाले ? 66 "" “ स्वामीजी ! आपण इथं बसा. मी आपल्याला सगळी कथा सांगयें. मग तुझी नीट गणित करून सांगा बरं, माझी सीता कधीं इथे फिरून येईल ती ! ती माझ्याजवळ फिरून आल्याशिवाय रहायची नाहीं !.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१४९
Appearance