मराठी ग्र दैवबळ.. तेथून जवळच बद्रीलाल त्रवाड्याची पेढी होती, तेथे जाऊन अयोध्यानाथानें जयपालसिंहाविषयीं दुसऱ्या एकजणाला माहिती विचारिली तेथें तीनचारजण बसले होते. त्यांतून एकजण ह्मणाला “जयपालसिंह पन्नास वर्षांपूर्वीच इथून निघून गेला.” दुसरा ह्मणाला “छे छे! पन्नास वर्षे कुठून होतील? त्याला जाऊन वीस एक वर्षे झालीं असतील-अधिक नाहीं ! " तिसरा ह्मणाला ' हां, वीस वर्षे ठेवली आहेत! अरे साठ वर्षे झाली असतील साठ ! माझे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी जयपालसिंह इथून निघून गेला. " या तिसऱ्या इसमाचें वय वीसबावीस वर्षांहून अधिक नव्हते. त्याचें लग्न होऊन फार तर पांचसहा वर्षे झाली असतील. अयोध्यानाथ ताबडतोब समजला कीं, हे लोक टवाळ आहेत. यांनां माहिती विचारण्यांत कांहीं अर्थ नाहीं. तेथून जवळच एका पेढींत एक सभ्य गृहस्थ बसलेला अयोध्यानाथाच्या दृष्टीस पडला. त्याच्या जवळ जाऊन अयोध्यानाथानें विचारले " महाराज, जयपालसिंहाची पेढी कुठे आहे, आपणाला ठाऊक आहे ? " त्या गृहस्थानें उत्तर दिले “जयपालासंहाची पेढी हल्लीं इथें नाहीं. कांहीं वर्षांपूर्वी तो इथून निघून गेला. कदाचित् तो मेलाहि असेल असे मला वाटतें इथून दक्षिणेकडे गेलें, ह्मणजे कांही अंतरावर जयपालसिंहाची बाग दिसते. तेथेच त्याची मंडळी असते. तिकडे जाऊन त्यांनां तुम्ही माहिती विचारा. " अयोध्यानाथाला ही माहिती मिळतांच तो दक्षिणेकडे जाऊं लागला. थोडासा. दूर गेल्यावर त्याला समोरच एक बाग दिसली. बागेच्या बाहेर त्याला कोणी मनुष्य न दिसल्यामुळे तो तसाच बागेत शिरला. बागेत एक लहानसें दुमजली घर होतें. हळुहळू अयोध्यानाथ त्या घराच्या दरवाजापाशीं पोंचला. घराच्या दरवाजाशींच एक स्त्री बागेतील माळ्याशी रडत रडत कांहीं बोलत होती. अयोध्यानाथ लक्ष्यपूर्वक तिचें बोलणें ऐकूं लागला. ती स्त्री रडत रडत म्हणत होती " दुष्ट, नष्ट चांडाळीण अवदसा मेली ! दररोज मेली गंगास्नान करते, जप करते, अन् करणी पहा कशी राक्षीसणीची ! मुलीचें पालनपोषण करून वाढवलीन् ती याचसाठीं वाटतं ! बादशहाच्या रंगमहालांत पाठवायला तिला घेऊन गेली ! डाकीण मेली ! " त्या स्त्रीचें हें भाषण अयोध्यानाथानें सर्व ऐकलें. शेवटचें वाक्य ऐकून त्याचें हृदय कांपूं लागले. त्याच्या मनांत अनेक विचार येऊं लागलं. ही मुलगी कोण ?
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१४८
Appearance