Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ ही रामाची अयोध्या दिवस तिचीहि भेट होईल! हाय ! पण माझ्या अदर्शनानें, बंधुभगिनीच्या वियोगानें तिला आजपर्यंत किती कष्ट भोगावे लागले असतील ! >> अशा रीतीनें विचार करित करित सूर्याकडे पाहून तो तरुण हात जोडून म्हणाला " हे सर्वसाक्षी सूर्यनारायणा ! या पृथ्वीवरील सर्व प्रदेश तुझ्या दृष्टील 'पडतात. मनुष्यांची सर्व कर्मे तुझ्याच दृष्टीखालीं घडतात. माझी प्राणप्रतिमा कुठे आहे ? माझी हृदयेश्वरी कुठे आहे ते कृपा करून मला सांग. हे वायो ! तूझी गति सर्वत्र आहे. तुला ठाऊक नाहीं असें कांहींहि नाहीं. मी कोणत्या देशांत गेलों असतां मला प्रियेचा लाभ होईल, हें सांग बरें ! " त्या विशोक वृक्षाला संबोधून तो तरुण म्हणाला “ बा अशोका ! पथिकांचे श्रम तूं दूर करतोस, सर्व जगताचा शोक तूं दूर करतोस, म्हणून तुला अशोक ह्मणतात. माझ्या हृदयांतील प्रबल दुःख आणि शोक तूं नाहीसा कर ! " या तरुणानें गोरखपुर सोडल्याला आज पांचसहा दिवस झाले. इतक्या दिवसांत त्याला सामान्य फलमूलांशिवाय दुसरे कांहींहि खावयास मिळाले नाहीं. क्षुधेनें आणि तृषेनें त्याचे प्राण कासावीस हाऊं लागले. येतांना रस्त्यांत त्यानें कांहीं फळे मुळे जमवून आणिली होतीं: क्षुधानिवारणार्थ तीं तो खाऊं लागला. फलाहार संपवून, दुपारचें ऊन अमळ कमी झाल्यावर तो कानपुर शहराकडे जाऊं लागला. कानपुरांत पोहोचतांच तो तडक बाजारांत गेला. या तरुणाची ओळख वाचकांस पूर्वीच झाली आहे - ह्याचें नांव पंडित अयोध्यानाथ ! कानपुरच्या बाजारांत मेघराजसिंह, लेकराज पांडे, दिर्गज शुक्ल, बद्रीलाल त्रवाडी, लाला हनुमान प्रसाद, दुर्जनसिंह, आणि मान्नालाल पांडे यांच्या पेढ्या मुख्य मुख्य होत्या. लेकराज पांड्याच्या पेढीजवळ पुष्कळ लोक जमले आहेत असे पाहून अयोध्यानाथ तिकडेच प्रथम गेला. तेथें जमलेल्या लोकांपैकी एकजणाला त्याने विचारले " भाई, जयपालसिंहाची पढी कुठे आहे, आपणाला ठाऊक आहे?" त्यानें उत्तर दिलें " जयपालसिंह कोण? मला नाहीं ठाऊक बुवा ! " इतक्यांत दुसरा एकजण ह्मणाला "होय होय, पूर्वी जयपालसिंहाची पेढी इथें होती पण बरेच दिवस झाले, तो इथून व्यापारधंदा बंद करून कुठे दुसरीकडे गेला. अयोध्यानाथानें विचारिलें " तो कुठे गेला, आपल्याला ठाऊक आहे ? " “नाहीं. तो कुठे गेला तें माहीत नाहीं, " असे ह्मणून तो इसम आपल्या कामाला निघून गेला.