संकटांवर संकरें ! सल्ला घेऊन नंतर मानकुमारीच्या शोधाला लखनौला जावयाचें, असा त्याने निश्चय केला. काशीनाथाच्या आत्महत्येनंतर सातव्या दिवशी अयोध्यानाथ सीतापुरला पोहोचला. गेल्याबरोबर काशीनाथाच्या मृत्यूचा सर्व वृत्तांत त्यानें नारायणकुमारी आणि चांदकुमारी यांनां सांगितला. आपल्या बंधूचे निधनवृत्त ऐकून चांदकुमारांच्या शोकाला पारावार राहिला नाहीं. तिचें धैर्य गळून गेलें; परंतु अयोध्यानाथाप्रमाणें नारायणकुमारीहि धीरवृत्तीची होती. ती चांदकुमारीचे सांत्वन करूं लागली. काशीनाथाच्या आत्महत्येची बातमी वृद्ध आणि आसन्नमरण गंगाप्रसादाच्या कानांवर जाऊं द्यावयाची नाही, असा त्या त्रिवर्गाचा निश्चय झाला. मानकुमारीच्या शोधासंबंधों पुढे काय करावें, याबद्दल नारायणकुमारीची संमती घेऊन अयोध्यानाथ लखनौला गेला. तीनचार दिवसांत तो लखनाला पोहोचला. तेथे पोहोंचतांच तो मानकुमारीचा शोध अगदी बारकाईने करूं लागला. कधीं संन्याशाच्या वेषानें, कधीं भविष्य पाहणाऱ्या कुडबुडया जोशाच्या वेषोनें तर कधीं फेरीवाल्या व्यापान्याच्या वेषाने अयोध्यानाथ लखनौंत आपल्या पतीचा ठिकठिकाणी शोध करूं लागला. लखनौला येतांना त्यानें सीतापुराहून बरोबर पुष्कळ द्रव्य आणिलें होतें. हळुहळू त्यानें बादशहाच्या महालांतील खोजांशी संधान बांधिलें. द्रव्याच्या योगानें या जगांत काय वाटेल तें होऊं शकतें ! बादशहाच्या महालांवरील खोजांपैकी खुरसद अल्ली नांवाच्या खोजाशीं अयोध्यानाशचा विशेष परिचय झाला होता. एके दिवशी खुरसदअल्लीच्या हातांत पन्नास रुपये देऊन– अयोध्यानाथानें त्याला विचारले “भाई, नबाबाच्या महालांत जी एक ठेंगणी उसकी अशी कचनी नवीनच आली आहे, तिच्याशीं नवाबानें निका लावला का?" खुरसदअल्ली ह्मणाला " कुदसिया सुलतान बेगम मेल्यानंतर कांही दिवसांनीं नबाबांनी तिच्याशीं निका लावला. " कुदसिया सुलतान बेगम ही कोण ? " खुरसदअल्लीनें आश्चर्यचकित होऊन विचारिलें “ तूं रहाणार कुठचा ? तूं कभीं कुदसिया बेगमेचें नांव ऐकले नाहींस ! "> " नाही, मीं ह्या बेगमेनें नांव ऐकले नाहीं " खुरसदअल्ली अयोध्यानाथाला पुढील हकीगत सांगू लागला. तो ह्मणाला "मुलके जामानियांनी प्रथम दिल्लीच्या बादशहाच्या मुलीशी विवाह केला. तिचें नांव ताजमहाल
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१४२
Appearance