१४२ ही रामाची अयोध्या ! होईल, तेव्हां मी या संसाराचा त्याग करीन आणि अरण्यांत जाऊन ईश्वरचिंतनांत सत्रे आयुष्य खर्च करीन. ” अशा प्रकारच्या गोटी बोलत बोलत ते उभयतां गंगानदीच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यानें दाक्षणेकडे चालले होते. हळुहळू ते नदीतीरावर येऊन पोहोचले. तें स्थान नदीच्या प्रवाहापासून सुमारे वीस हात उंचीवर होतें. तेथून नदीत कोणी पडले तर त्याला पुनः तीरावर येणे शक्य नव्हते. या स्थळी पोहोचताच काशीनाथाला पुनः तो भ्रांतावस्था प्राप्त झाली. त्याचवेळी आत्महत्येची अत्यंत प्रबल इच्छा त्याच्या मनांत झटकन् उत्पन्न झाली. "अयोध्यानाथ | हा मी चाललों पुनः कधीं भेटणार नाहीं." असें ह्मणून काशीनाथानें झपकन् नदीत उडी टाकली व क्षणार्धात तो दिसेनासा.. झाला. किनाऱ्यावरून जलप्रवाहाकडे जावयाला रस्ता नव्हता. त्याप्रसंगी काय करावें तें अयोध्यानाथाला कांहीं सुचेना हतबुद्ध हाऊन तो प्रवाहाकडे पहात तेथेंच उभा राहिला. नदीतीरावर कोणी चिटपांखरूंहि या वेळी नव्हते. जवळपास मनुष्याचा शब्दहि ऐकूं येत नव्हता. अयोध्यानाथ किंकर्तव्यता मूढ होऊन खाली बसला. काय करावे? प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांदेखत आपला मेहुणा नदीत उडी घेतो आणि त्याला वर काढावयाला आपला कांहीं इलाज चालत नाहीं ! थोड्या वेळानें काशीनाथाचें शरीर पाण्यावर तरंगून येईल असे त्याला वाटले; परंतु एक प्रहरपर्यंत त्याचें शरीर वर आले नाहीं. अयोध्यानाथाची सर्व आशा खुंटली. काशीनाथ गंगेल बुडून मेला, अशी त्याची खात्री झाली. अयोध्यानाथावर संकटांचा वर्षाव होऊं लागला ! काशीनाथाच्या शोकानें त्याचें हृदय दग्ध होऊन गले. त्याची निःसीम परोपकार वृत्ति आणि वैराग्य यांचें स्मरण होऊन अयोध्यानाथ सारखें अश्रुविसर्जन करूं लागला; परंतु तो विलक्षण प्रकृतीचा मनुष्य होता. संकटप्रसंगी त्याचे हृदय डळमळत नसे लहानपणापासून शोकदुःखाचे प्रसंगी धैर्यावलंबन करावयाला त्यानें आपल्या मनाला चांगले शिक्षण दिले होतें. अयोध्यानाथ चांगला शास्त्रज्ञ, धर्मशील आणि कर्तव्यपरायण तरुण होता. याहि प्रसंगी त्याचे मन डगमगले नाही. काशीनाथाच्या मुत्यूची वार्ता आपले वृद्ध श्वशुर आणि त्यांच्या दोन विधवा मुली यांच्या कानांवर कशी घालावी, त्यांचें सांत्वन कसे करावें, याबद्दल अयोध्यानाथाच्या मनांत अनेक विचारतरंग येऊं लागले. बराच वेळ विचार केल्यानंतर प्रथम आपणाला सीतापुरलाच गेलें पाहिजे, असे त्याने ठरविलें. तेथे जाऊन नारायणकुमारीचा
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१४१
Appearance