ही रामाची अयोध्या ! आहे या संशयाने मला त्यांनी पकडून आणिलें ! साहेब, मी चोर नाहीं - मला फांशीं — " इतकें बोलून तो वृद्ध बोलण्याच्या श्रमानें अत्यंत क्लांत होऊन पडला. त्याच्या तोंडांतून फेंस येऊ लागला. थोड्याच वेळांत त्याला घरघर लागली आणि दोनतीन तासांनी म्हातारा संसाराच्या त्रासांतून कायमचा मुक्त झाला ! तो वृद्ध ब्राह्मण ही कथा सांगत असतां, भगवीं वस्त्रे परिधान केलेला अत्यंत सुंदर असा एक तरुण पुरुष ही सर्व कथा अगदी लक्ष्यपूर्वक ऐकत होता. हा युवक संन्याशाच्या वेषांत फिरत असतां ठग समजून यालाहि शिपायांनीं धरून मॅजिस्ट्रेटाकडे चौकशीसाठी पाठवून दिले होते. चौकशीत मंजिस्ट्रेटाला त्याच्याविरूद्ध कांहीं पुरावा असल्याचे दिसून आलें नाहीं. त्याच्यावर एकहि गुन्ह्याची शाविती झाली नाहीं. पण मॅजिस्ट्रेटानें त्याला सोडून दिले नाही. त्याला इतर ठगांविरूद्ध साक्षी करून सेशन कोर्टात पाठविले. त्या म्हाता-याचा मृत्यु झाल्यानंतर संशनजज्जाजवळ जाऊन हात जोडून हा तरुण म्हणाला “हुजूर ! दिल्लाजवळ माझा बाप पंडित शांतप्रसाद आणि आमची एक परिचारिका या दोघांचे या ठगांनी खून केले. ठगांनी केलेल्या आघातांनीं मीहि अचेतन होऊन पडलो होतो. मी मेलों असे समजून मला यांनी नदीत फेकून दिले पण नदीत पाणी अधिक नव्हतें. यांनी फेकून दिल्यावर मी सुक्या वाळूत पडलो. सकाळच्या सुमारास मी शुद्धीवर आल्यावर एका शिपायाने मला नदीतून उठवून सीतापुरला पाठवून दिलें. हल्लों मी भगवीं वस्त्रे परिधान करून संन्याशाच्या वेषानें देशपर्यटन करित होतो शिपयांनी मला उगीचच्या उगीच धरून इकडे पाठवून दिले. या ठगांशी माझा कधीहि संबंध नव्हता आणि यांपैकी एकाहि ठगाला मी ओळखित नाहीं.” त्या तरुणाची हकीगत ऐकून सेशन जज्जाने त्याला सोडून दिले. त्याला साक्ष द्यावी लागली नाहीं.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१३५
Appearance