गोरखपुर येथील सेशन कोर्ट. १३३ त्या वृद्ध ब्राम्हणाचें हें भाषण ऐकून साहेब मोठ्या विचारांत पडला. साहेबान त्याला विचारले " तुझे काय प्रश्न आहेत, विचार पाहूं ? 6 म्हातारा थोडासा स्थिर होऊन म्हणाला " साहेब, मला आपणाला इतकेंच विचारावयाचे आहे की, देशाचा राजा जर या ठगांप्रमाणे आणि दरोडखोरांप्रमाणें प्रजेचें सर्वस्व हरण करूं लागला, आणि राज्यांतील स्त्रियांवर अत्याचार करूं लागला, तर त्याचा न्याय कोण करणार ? " साहेबाला म्हाताऱ्याचें भाषण कांहीच समजले नाहीं. तो वृद्ध ब्राह्मण साहेबाला पुनः पुनः विचारू लागला " देशाच्या राजानेच प्रजेचें सर्वस्व हरण केले, तर त्याचा न्याय कोण करणार ? 22 " त्याचा हा प्रश्न ऐकून साहेब गोंधळांत पडला. तो म्हणाला " काय म्हणतो तें मला मुळींच समजत नाही. तूं आपली सर्व हकीगत मला सांग, म्हणजे तुझें बोलणे माझ्या नीट लक्ष्यांत येईल. " वृद्ध ब्राह्मण रडत रडत म्हणाला "साहेब, माझ्या बेचाळीस पूर्वजांत कोणी चोरी किंवा दरोडेगिरी केली नव्हती ! मी अत्यंत पापी म्हणूनच मी या चोरांच्या टोळींत शिरलो. साहेब, माझा सर्व वृत्तांत सांगतांना माझें हृदय फाटून जातें ! ” साहेबाने गोड शब्दांनीं त्या वृद्ध ब्राम्हणाचें सांत्वन केले. थोड्या वेळाने म्हातारा बोलू लागला " साहेब, माझें नांव पंडित वलदेवप्रसाद. माझ्या वडील भावाचें नांव पंडित देवीप्रसाद. आम्ही दोघे बंधु सीतापुरच्या पंडित शंभुप्रसादाचे पुत्र. पंडित शंभुप्रसादाप्रमाणें या देशांत कोणांहि ज्योतिषी झाला नाहीं ! अयोध्येचा वजीर नवाब साइतअली हद्दपार होऊन भटकत असतां माझ्या बापार्शी त्याची गांठ पडून आपल्या भविष्याची फलाफल गणना करण्यास त्याने माझ्या बापाला विनंति केली. माझ्या बापाने गणित वरून सादतअल्लीला सांगितले की तुला निश्चयपूर्वक अयोध्येचें सिंहासन प्राप्त होईल. ' माझ्या बापाच्या भविष्या प्रमाणे पुढे काही वर्षांनी सादतअल्ली खरोखरच अयोध्येच्या गादीवर बसला. गादी मिळाल्यावर कृतज्ञताबुद्धानें सादतअलीने माझ्या पित्याला लहानशी जहागीर देऊन तिच्यावरचा कर माफ केला; परंतु सादतअल्लीच्या मृत्युनंतर गाजीउद्दीन हैदराचे कारकिर्दीत सीतापुर परगण्याचा तालुकदार इब्राहिमखां यानें त्या कर माफ केलेल्या जहागिरीबद्दल आमच्याजवळ सात वर्षांच्या कराची मागणी केली. आम्हा गरीब ब्राम्हण ! सात वर्षाच्या कराची रकम आम्ही कुटून देणार ? 6
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१३२
Appearance