१३२ ही रामाची अयोध्या ! -रस्त्यांतच टाकून देऊन पळून जाऊं लागल्यें. टोळीतले दुसरे सगळे लोक पळून गेले; मी मात्र एका शिपायाच्या हातांत सांपडल्यें. " " ती मुलगी हल्लीं कुठे आहे ? " "( त्या मुलीला साहेबानं नेल हल्लीं ती कुठं आहे ते मला माहीत नाहीं. " तुमच्या टोळीचा नाईक कोण ? (1 29 " आमच्या टोळीचे नाईक माझ यजमान जीवनदास. मी टोळीची जमादारीण " होत्यें.' 66 तुमच्या टोळीत किती लोक होते? " " चाळीस. 79 “ त्यांची नांवें सांग पाहूं. 66 " माझा मुलगा रूपला, त्याच्या दोन बायका राधा आणि रुक्मिणी, माझे घरधनी जीवनदास, मंगलदास, इमामबक्ष, मनाखां. गणश अन् दुसरे बरेच आहेत. हा म्हातारा ब्राह्मण आमच्या टोळात दहा वर्षांपूर्वी होता. याला आझी शाळिग्रामसिंह ह्मणत असू , सेशन जज्ज मि. वुइलसन यांनी या वेळी आमरीची साक्ष घेण्याचें बंद करून तिनें दाखावलेल्या वृद्ध ब्राह्मणाची साक्ष घेण्याचे ठरविलें. कारण, तो ब्राम्हण अगदीं मृत्यूच्या दाराशी येऊन ठेप होता आणखी एखादा दिवस फार तर तो वांचेल असे वाटल्यावरून सेशन जज्जानें त्याचीच साक्ष अगोदर घेण्याचा निश्चय केला. त्या वृद्ध मनुष्याला हलण्याचीहि शक्ति राहिली नव्हती. तो कोटांच्या बाहेर एका जीणे घोंगडीवर पडला होता. ठगांनां पकडणाच्या पोलिसनें त्याला संन्याशाच्या वेषांत फिरतांना पाहून हाहि ठगच असेल असे समजून त्याला पकडून आणले होतें. त्याला उभे राहून साक्ष देण्याची शक्ति नाहीं असे पाहून जज्ज साहेब त्याच्या घोंगडीजवळ बसून त्याची साक्ष घेऊं लागले. साहेबानें त्याला प्रश्न करतांच तो ढळढ रहूं लागला. तो म्हणाला “साहेब, मी घोर पातकी आहे ! तुम्ही मला अगोदर फांशी द्या! माझ्या बंधूच्या मार्गाचें अवलंबन मीं न केल्यामुळे माझी ही अशी दशा झाली आहे ! साहेब, मला अगोदर फांसावर चढवा !” साहेब त्या वृद्ध ब्राम्हणाला नीट समजावून सांगू लागला. मृदु शब्दांनी त्याने विचारले “ दिल्लीच्या खुनांचे वेळीं तूं तथे हजर होतास की नाहीं ! तसेंच दुसरे कोणकाण तेथे हजर होत, सांग बरें. " " साहेब, माझ्या प्रश्नाचें तुम्हीं अगोदर उत्तर दिल्याशिवाय मी तुमच्या प्रश्नांची उत्तरें देणार नाहीं ! तुम्ही माझे काय कराल ? मला फांशी द्याल ? मला तर तेच पाहिजे आहे !
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१३१
Appearance